Take a fresh look at your lifestyle.

मुंबई महापालिका जिंकली; राणेंना हायकोर्टाचा दणका, ‘इतक्या’ लाखांचा ठोठावला दंड

0

ओटीटी न्यूज नेटवर्क

मुंबई : केंद्रीय मंत्री आणि भाजप नेते नारायण राणे यांना आदिश बंगला बांधकामप्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाने मोठा दणका दिला आहे. बंगल्याबाबतची याचिका न्यायालयाने फेटाळली आहे. तसेच अनधिकृत बांधकामासाठी 10 लाखांचा दंड ठोठावण्यात आला असून मुंबई महापालिकेला कारवाई करण्याची परवानगी देण्यात आली आहे.

शिंदे सरकारचा मोठा निर्णय; १८१ भूखंडाच्या वाटपाचा मार्ग मोकळा

नारायण राणे यांचा मुंबईतील जुहू येथे अधिश नावाचा बंगला आहे. या बंगल्यात अनधिकृत बांधकाम झाल्याच्या अनेक तक्रारी दाखल झाल्या आहेत. त्यामुळे मुंबई पालिकेने राणेंच्या बंगल्याची दोन वेळा पाहणी केली होती. त्यानंतर मुंबई महापालिकेने नारायण राणेंच्या बंगल्याला नोटीसही बजावली. या नोटिशीच्या विरोधात नारायण राणे यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. उच्च न्यायालयाने राणेंची याचिका निकाली काढली आहे. यावेळी न्यायालयाने अंतिम निर्णय देत राणेंना दणका दिला.

देशातील परकीय गंगाजळीत कमालीची घट; अर्थतज्ज्ञांकडून चिंता व्यक्त

आज न्यायालयाने शेवटचा निर्णय दिला आहे. बांधकाम नियमित करण्याची त्यांची याचिका फेटाळण्यात आली आहे. नारायण राणे यांनी समुद्रकिनारी तीन वेळा बांधकाम केल्याचे न्यायालयाने म्हटले आहे. त्याच्या वकिलांनी कारवाईसाठी स्थगिती मागितली होती, मात्र ती नाकारली आहे. त्यांच्यावर 10 लाखांचा दंड ठोठावण्यात आला असून, त्यामुळे महापालिकेला बेकायदा बांधकाम पाडण्याची परवानगी देण्यात आल्याची माहिती वकील आदित्य प्रताप यांनी दिली.

असेच सुपरफास्ट अपडेट मिळवण्याकरिता या लिंकवर क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.