Take a fresh look at your lifestyle.

अखेर राणा दाम्पत्याला दिलासा; या ‘अटींवर’ तब्बल 12 दिवसांनी कोठडीतून सुटका

0
maher

ओटीटी न्यूज नेटवर्क

मुंबई – राजद्रोहाच्या आरोपाखाली अटकेत असलेल्या राणा दाम्पत्याला जामीन मंजूर झाला आहे. मुंबई सत्र न्यायालयानं राणा दाम्पत्याला मोठा दिलासा दिला आहे. खासदार नवनीत राणा (Navneet Rana) आणि आमदार रवी राणा (Ravi Rana) यांना मुंबई सत्र न्यायालयाकडून सशर्त जामीन मंजूर करण्यात आला आहे. तब्बल 12 दिवसांनी राणा दाम्पत्याची कोठडीतून सुटका झाली आहे.

तुमच्याकडे 5 रुपयांची जुनी नोट असेल तर घरबसल्या लखपती बनण्याची ही सुवर्णसंधी सोडू नका!

दरम्यान, राणा दाम्पत्याच्या जामीन अर्जावर शनिवारी झालेल्या सुनावणी दरम्यान, दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकल्यानंतर न्यायालयानं आपला निकाल राखून ठेवला होता. आमदार रवी राणा यांच्याविरोधात 17, तर खासदार नवनीत राणा यांच्याविरोधात 6 गुन्हे दाखल आहेत. त्यामुळे सरकारी वकिलांनी राणा दाम्पत्याच्या जामिनाला विरोध केला होता. आज पुन्हा राणा दाम्पत्याच्या जामीन अर्जावर सुनावणी पार पडली. त्यावेळी न्यायालयानं त्यांना दिलासा दिला आहे.

आता राज ठाकरे आरोपी नंबर 1, ‘या’ कलमांतर्गत गुन्हा दाखल

नेमकं प्रकरण काय?

सध्या राज्यात मशिदींवरील भोंगे, हिंदुत्व आणि हनुमान चालिसा यांवरुन राजकारण चांगलंच तापल्याचं पाहायला मिळत आहे. अशातच अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांनी काही दिवसांपूर्वी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचं निवासस्थान असलेल्या ‘मातोश्री’बाहेर हनुमान चालिसाचं पठण करणार असल्याची घोषणा केली होती. नवनीत राणा यांच्या घोषणेनंतर राज्यभरातून शिवसैनिक आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं होतं.

आता CIBIL Score ठेवा चांगला! स्कोअर चांगले असलेल्यांनाच कर्ज मंजूर

राणा दाम्पत्य मातोश्रीबाहेर हनुमान चालिसा पठण करण्यासाठी मुंबईत दाखल झालं, तर दुसरीकडे शिवसैनिकांनी राणा दाम्पत्याविरोधात मातोश्रीबाहेर ठिय्या दिला. राणांच्या घोषणेनंतर शिवसेना समर्थक चांगलेच संतप्त झाले आणि त्यांनी राणा यांच्या खार येथील घराबाहेर जोरदार निदर्शनं केली. तसेच, दोन दिवस शिवसैनिकांनी मातोश्रीबाहेरही राणा दाम्पत्यांविरोधात ठिय्या दिला होता.

IMPORTANT: तुमचं Pan Card वापरून इतर कोणी loan घेतलंय का? ‘या’ सोप्या पद्धतीने तपासा

तब्बल तीन दिवस हाय व्होल्टेज ड्रामा सुरुच होता, त्यानंतर अखेर पंतप्रधान मुंबईत येत असल्यानं आपण मातोश्रीबाहेर हनुमान चालीसाचं पठण करण्यासाठी जाणार नसल्याचं राणा दाम्पत्यानं व्हिडीओ जारी करत सांगितलं आणि या नाट्यावर पडदा पडला. पण त्यानंतर राणा दाम्पत्याच्या अडचणीत मोठी वाढ झाली.

एखाद्याच्या कर्जाला जामीनदार होताय? आधी ‘या’ गोष्टी समजून घ्या नाहीतर होईल पश्चाताप

पोलिसांनी खासदार नवनीत राणा आणि त्यांचे पती आमदार रवी राणा यांना अटक केली. त्या दिवशीची रात्र राणा दाम्पत्याची पोलीस कोठडीतच गेली. दुसऱ्या दिवशी रविवारी त्यांना न्यायालयासमोर हजर केलं गेलं. न्यायालयानं त्यांना 14 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली होती. त्यानंतर राणा दाम्पत्यानं जामीन अर्ज दाखल केला होता. त्यानंतर अनेक सुनावण्या झाल्या. सरकारकडून राणा दाम्पत्याच्या जामीन अर्जाला जोरदार विरोध केला जात होता. आज अखेर त्यांना जामीन मंजूर करण्यात आला.

एखाद्याच्या कर्जाला जामीनदार होताय? आधी ‘या’ गोष्टी समजून घ्या नाहीतर होईल पश्चाताप

Leave A Reply

Your email address will not be published.