Take a fresh look at your lifestyle.

पेट्रोल डिझेलच्या पाठोपाठ पुन्हा खूशखबर; खाद्य तेलांच्या दरात मोठी घसरण

maher

ओटीटी न्यूज नेटवर्क

नवी दिल्ली – Mustard Oil Price देशभरात सध्या वाढत्या महागाईमुळे सर्वसामान्यांचं बजेट कोलमडलं असल्याचं चित्र आहे. गेल्या काही आठवड्यांपासून पेट्रोल, डिझेल तसेच इतर इंधनांच्या किंमतीत मोठी वाढ होत आहे. महागाईसोबतच सततच होणाऱ्या इंधन दरवाढीमुले सर्वसामान्यांच्या खिशाला झळ बसत आहे. परिणामी, नागरिकांमध्ये मागच्या काही महिन्यांपासून नाराजीचा सूर पाहायला मिळत आहे.

केंद्रानंतर आता राज्याकडून पेट्रोल डिझेल स्वस्त!राज्याच्या तिजोरीवर मोठा पडणार भार

मात्र, केंद्र सरकारकडून नुकतीच पेट्रोल आणि डिझेलवरील उत्पादन शुल्कात कपात करण्यात आली. त्यामुळे सर्वसामान्यांना काही प्रमाणात केंद्र सरकारतर्फे दिलासा मिळाला आहे. विशेष म्हणजे केंद्र सरकारकडून सामान्यांना आणखी एक दिलासा मिळाला असून आता कच्च्या घाणीच्या तेलात मोठी घसरण झाली आहे. हाती आलेल्या माहितीनुसार, इंडोनेशियाने निर्यात पुन्हा सुरू केली असून त्यामुळे खाद्य तेलाच्या किमतीत घट झाली आहे.

PAN-Aadhaar लिंक होत नाहीय? जाणून घ्या कारणं; असं करा ऑनलाइन पद्धतीने पॅन कार्ड (PAN Card) आधार कार्डशी लिंक

इंडोनेशियातून निर्यात पुन्हा सुरू
परदेशी बाजारपेठेत खाद्यतेलाच्या दरात वाढ होत असताना, इंडोनेशियातून निर्यात सुरू झाल्याचा परिणाम देशाच्या बाजारपेठेवर झाला आहे. गेल्या आठवड्यात बहुतांश तेल-तेलबियांच्या किमतीत घसरण दिसून आली. परिणामी मोहरीचे तेल 40 रुपयांनी स्वस्त झाले आहे. खाद्यतेलाच्या दरातील ही मोठी घसरण मानली जात आहे.

Ola E-Scooter ला टक्कर देणाऱ्या दोन इलेक्ट्रिक स्कूटर लाँच ; सिंगल चार्जमध्ये ११५ किमी रेंज, अवघ्या ४९९ रुपयांत करा बुकिंग

मोहरीच्या दरात 100 रुपयांची घसरण
गेल्या आठवड्याच्या तुलनेत या आठवड्यात मोहरीचे भाव 100 रुपयांनी घसरून 7,515-7,565 रुपये प्रतिक्विंटल झाले आहेत. त्यामुळे मोहरी दादरी तेल क्विंटलमागे 250 रुपयांनी घसरून 15050 रुपये झाले.

गेल्या आठवड्यात परदेशातील बाजारातील वाढीव किंमतीमुळे कच्च्या पाम तेलाचे भावही 500 रुपयांनी घसरून 14,850 रुपये प्रति क्विंटल, पामोलिन कांडला 520 रुपयांनी घसरून 15,200 रुपये झाले.

असेच सुपरफास्ट अपडेट मिळवण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

Comments are closed.