Take a fresh look at your lifestyle.

नगरपालिका सेवानिवृत्त संघटनेचा मेळावा संपन्न

0
maher

अनिल पांडे, ओटीटी न्यूज नेटवर्क

श्रीरामपूर : राज्यातील नगरपालिका, महानगरपालिका क्षेत्रातील सेवानिवृत्त शिक्षकांना मिळणारे सेवानिवृत्ती वेतन हे ५० टक्के, ८० टक्के व ९० टक्के दिले जाते .त्यामुळे सेवानिवृत्त यांच्या निवृत्तीवेतनासाठी विलंब होऊन अनेक ठिकाणी अनियमितता दिसून येते. याबाबत राज्य शासनाकडे योग्य तो पाठपुरावा करून राज्यातील सर्वच नगरपालिका शिक्षकांना 100% निवृत्तीवेतन व वेतन मिळण्यासाठी आपण प्रयत्न करू असे आश्‍वासन पेन्शनर संघटनेचे जिल्हाध्यक्ष द मा ठुबे यांनी दिले. अहमदनगर जिल्हा नगरपालिका विभागाच्या जिल्हा मेळाव्यात अध्यक्ष स्थानावरुन ते बोलत होते .मेळाव्यात जिल्ह्यातील नगरपालिका विभागातील सेवानिवृत्त शिक्षक, शिक्षिका व पदाधिकारी उपस्थित होते.

प्रास्ताविक भाषणात पेन्शनर संघटनेचे नगरपालिका विभागाचे जिल्हाध्यक्ष प्रताप देवरे यांनी आत्तापर्यंत संघटनेने केलेली कामे व सेवानिवृत्त शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांना काही ठिकाणी नगरपालिका हिस्सा न मिळाल्याने थकित असलेले सेवानिवृत्तीवेतन याबाबत माहिती दिली. श्रीरामपूर व कोपरगाव नगरपालिकेकडे एक कोटी पेक्षा जास्त पेन्शन थकीत आहे. गेले काही महिने दर महिन्याच्या २० तारखे नंतर पेन्शन जमा होत आहे . या वर्षात चार पाच वेळा पुणे येथील कार्यालयात पेन्शन बिलास आक्षेप लागल्यामुळे सेवानिवृत्तांना वेळेवर पेन्शन मिळालेली नाही . त्यामुळे त्यांना आर्थिक अडचणीला सामोरे जावे लागते . तरी शासनाकडून नगरपालिका विभागातील शिक्षकांना शंभर टक्के पेंशन तसेच शिक्षकांना शंभर टक्के वेतन मिळण्या कामी जिल्हा पेन्शनर्स असोसिएशन ने पुढाकार घ्यावा अशी मागणी केली .

यावेळी शिक्षक बँकेचे माजी संचालक रामभाऊ ऊगले, माजी शिक्षण विस्ताराधिकारी जयराम दादा हळनोर, कचरु निंभोरे, लहुजी कोल्हे, सुरेश कांबळे ,तालुका अध्यक्ष रावसाहेब पवार, सरचिटणीस लतीफ शेख यांनीही आपले मनोगत व्यक्त केले.

कार्यक्रमास पाटीलबा खपके, देवराम गुलदगड, विलास निकम, शब्बीर शेख, अशोक बागुल, आशोक कानडे, अशोक गायकवाड, गणपत गायकवाड, यमाजी कांबळे, बापू टाक, रामचंद्र हेलकुटे, सुनंदा माळवे ,कल्पना घरोटे, लिलाबाई व्यवहारे, सिराजूनिसा पठाण, जयश्री क्षिरसागर, लिलाबाई अंबिलवादे, मीनाक्षी सूर्यवंशी, छाया घाडगे, सुमन कांबळे, आशा वावळ, मोहिनी आवटी, माधवी कुलकर्णी, तारामती पानसरे, बिना रजपूत, मारुती लोहकरे, शिवाजी गोसावी, सुधाकर रोकडे, ज्ञानेश्वर आढाव, चंद्रकांत फुलवर, सुरेश यादव, प्रताप शिंदे, ठाणगे, मोरे, हरके आदी उपस्थित होते. सूत्रसंचालन पेन्शनर संघटनेचे शहराध्यक्ष प्रकाश माने यांनी केले तर आभार रामभाऊ ऊगले यांनी मानले.

Leave A Reply

Your email address will not be published.