Take a fresh look at your lifestyle.

“माझी सैराटसाठी निवड झाली नाही, पण अचानकच…”; ‘झुंड’मधील ‘भावना भाभी’ने सांगितला किस्सा

0

ओटीटी न्यूज नेटवर्क

मुंबई – नुकताच नागराज मंजुळे दिग्दर्शित झुंड हा चित्रपट रिलीज झाला. बॉलिवूडचे जेष्ठ अभिनेते अमिताभ बच्चन यांनी देखील या चित्रपटात प्रमुख भूमिका साकारली आहे. प्रमुख भूमिका असलेला झुंड या चित्रपटाने प्रेक्षकांची मनं जिंकली होती. हा चित्रपट सध्या सर्वत्र चर्चेचा विषय ठरत असून समाजाच्या सर्वच स्तरांतून या चित्रपटाचं कौतुक होताना दिसत आहे. विशेष म्हणजे प्रदर्शनाच्या अनेक दिवसानंतर देखील या चित्रपटाची क्रेझ अद्याप कायम आहे. या चित्रपटात अमिताभ बच्चन यांच्यासोबत रिंकू राजगुरु, आकाश ठोसर, सायली पाटील यांच्या प्रमुख भूमिका आहेत. काही दिवसांपूर्वी नागराज मंजुळे यांनी या चित्रपटातील कलाकारांची कास्टिंग कशी झाली, याबाबतचे किस्से सांगितले होते.

चक्क ‘या कारणासाठी’ पेट्रोल पंपावर उसळली तोबा गर्दी; सत्य कळताच पंपचालकही चक्रावले

दरम्यान, तरुणाईमध्ये झुंड चित्रपटातील भावना या पात्राची वेगळीच क्रेझ पाहायला मिळते. या चित्रपटात भावना भाभी हे पात्र सायली पाटील हिने साकारले आहे. काही दिवसांपूर्वी दिग्दर्शक नागराज मंजुळेंनी एका वृत्तवाहिनीला मुलाखत दिली होती. या मुलाखतीत झुंडमधील कलाकारांच्या कास्टिंगबद्दलची माहिती दिली आहे. यावेळी ते म्हणाले की, “सायली ही सैराटच्या ऑडिशनसाठी आली होती. त्यावेळी तिनं चांगल काम केलं होतं. पण तिची निवड झाली नाही.”

“सायली ही फार चांगली कलाकार आहे. ज्यावेळी मी या चित्रपटातील भावना ही भूमिका लिहित होतो, त्यावेळी मला सायली ही भूमिका चांगल्या प्रकारे करेल असे वाटले होते. त्यानंतर मी सायलीला फोन केला. त्यावेळी तिला चित्रपटाबद्दल सांगितले. पण तिला यावर विश्वासच बसत नव्हता.” असे नागराज मंजुळेंनी सांगितले.

रशिया-युक्रेन युद्धात भारताला सर्वात मोठी संधी! शेतकऱ्यांना लागणार लॉटरी?

“तेव्हा ते म्हणाले की मी नागराज मंजुळे बोलतो. तेव्हा मी माझ्या मनात म्हणाले, मग मी ऐश्वर्या राय बोलते. मला खरंच वाटतं नव्हतं की नागराज सरांनी मला फोन केला. मला वाटलं माझे मित्र माझ्यासोबत थट्टा मस्करी करत आहेत. त्यानंतर मी नागराज सरांना भेटायला गेले, तेव्हा त्यांनी मला चित्रपटाबद्दल सांगितलं. त्यांना पाहून मी थक्क झाले होते. त्यावेळी त्यांनी अमिताभ बच्चन हे या चित्रपटात प्रमुख भूमिका साकारणार आहेत, असेही सांगितले. यानंतर मात्र मला फार भारी वाटलं. आता स्वत:ला पाहून फार छान वाटत आहे.”

चक्क ‘या कारणासाठी’ पेट्रोल पंपावर उसळली तोबा गर्दी; सत्य कळताच पंपचालकही चक्रावले

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.