Take a fresh look at your lifestyle.

Narendra Modi: “तो कोणता पंजा होता जो 1 रुपयातून 85 पैसे घासून घेत होता” पंतप्रधान मोदींचा काँग्रेसवर निशाणा

0

ओटीटी न्यूज नेटवर्क

बर्लिन – पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी बर्लिन (Berlin)मध्ये भारतीयांना संबोधित केलं. भारताच्या विकासाला गती देण्यपासून लोकल फॉर वोकल, स्टार्टअप, डीबीटीसह कलम 370 हटवण्याच्या संदर्भात केंद्र सरकारने (Central Government) केलेल्या कार्यांचा पाढा वाचला. त्याच दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विरोधी पक्ष असलेल्या काँग्रेसवर अप्रत्यक्षरित्या निशाणा साधला आहे.

आता ‘असं’ करा तुमचं जन धन खातं आधार कार्डशी लिंक, मिळवा तब्बल 1.3 लाखांचा फायदा

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या भाषणाची सुरुवात भारत माता की जय ने केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, जर्मनीला यापूर्वीही मी आलो आहे, तुमच्यापैकी अनेकांना भेटलो सुद्धा आहे. या ठिकाणी तरुणांची वर्दळ अधिक आहे, त्यामुळे तरुणाईचा उत्साहही आहे. जर्मनीत भारतीयांची संख्या कमी असली तरी तुमच्या स्नेहात, उत्साहात अजिबात कमी नाहीये.

एखाद्याच्या कर्जाला जामीनदार होताय? आधी ‘या’ गोष्टी समजून घ्या नाहीतर होईल पश्चाताप

जेव्हा आपण भारतीयांच्या विविध श्रेणींबाबत भाष्य करतो त्यावेळी भारतात राहणारे लोकच नाही तर तुम्हीही त्यात सामील होतात. 21व्या शतकातील हा काळ भारतासाटी आम्हा भारतीयांसाठी खूप महत्त्वाचा आहे. आजचा भारत निर्धाराने पुढे जात आहे. तुम्हाला सुद्धा माहिती आहे की, जेव्हा एखादा व्यक्ती काही ठरवतो तेव्हा देश नव्या मार्गाने चालतो आणि इच्छित स्थळ गाठून दाखवतो असंही पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले.

Business Idea: ‘या’ बिझनेस मधून होईल बंपर कमाई, सरकार देखील करणार तब्बल ‘इतकी’ मदत

पंतप्रधान नरेंद्र मोदी पुढे म्हणाले, एक बटण दाबल्याने भारतातील राजकीय अस्थिरता संपली. एक बटण दाबताच भारताने तीन दशकांची अस्थिरता संपवली. भारतातील मतदारांनी 30 वर्षांनंतर 2014 मध्ये पूर्ण बहुमताचे सरकार निवडून दिले. भारतातील मतदारांची ताकद माहीत आहे.

आज देश प्रत्येक क्षेत्रात झपाट्याने प्रगती करत आहे. पूर्वी तुम्ही जिथे जाल तिथे काम सुरू असल्याचा फलक लावला होता. आता देशहही तोच आहे, फाइलही तीच आहे. सरकारी यंत्रणाही तीच आहे पण देश बदलला आहे. आता भारत लहान विचार करत नाही. भारतात इंटरनेट कनेक्टिव्हिटी सर्वात वेगवान आहे. 6 लाख गावे ऑप्टिकल फायबरने जोडली गेली आहेत. आता 5जी येत आहे असंही मोदी म्हणाले.

राज ठाकरेंची सभा संपताच अजित पवार कडाडले, म्हणाले, ‘नो कॉम्प्रमाईज’

आमच्या सरकारच्या कार्यकाळात मोठ्या संख्येने लोकांच्या खात्यात थेट लाभ पोहोचला आहे. कोणत्याही मध्यस्थिशिवाय हे शक्य आहे. पैसे कापले नाहीत. आता कुठल्याही पंतप्रधानाला बोलावं लागणार नाही की मी 1 रुपया पाठवतो तर 15 पैसे पोहोचतात. तो कोणता पंजा होता जो एक रुपयातून 85 पैसे घासून घेत होता असं म्हणत पंतप्रधान मोदींनी काँग्रेसवर निशाणा साधला आहे.

BREAKING : भर सभेत हाणामारी, ‘चौरंग करून घरी पाठवेन’, राज ठाकरेंनी सुनावले

Leave A Reply

Your email address will not be published.