Take a fresh look at your lifestyle.

नरेंद्र मोदी पुन्हा एकदा बनले जगातील सर्वाधिक लोकप्रिय नेते

0

ओटीटी न्यूज नेटवर्क

नवी दिल्ली : भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची प्रसिद्धी केवळ भारतापुरती मर्यादित नसून ते जगभरात लोकप्रिय नेते म्हणून प्रसिद्ध आहेत. आता तर चक्क पुन्हा एकदा भारतीय पंतप्रधानांनी जगातील लोकप्रिय नेत्यांच्या यादीत अव्वल स्थान मिळविले आहे. यादीनुसार वेगवेगळी वेशभूषा, आगळेवेगळे निर्णय, दौरे व नेतृत्वपध्द्ती इत्यादी बाबींमुळे जगभरातील लोकांमध्ये नरेंद्र मोदी यांची वेगळी छाप आहे. त्यामुळे सध्या अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांना सुद्धा भारतीय पंतप्रधानांनी प्रसिद्धीच्या दृष्टीने मागे टाकले आहे.

उद्धव ठाकरेंची मोठी घोषणा; शिवसेना आणि संभाजी ब्रिगेडची युती

मॉर्निंग कंसल्ट पॉलिटिकल इंटेलिजन्स ने नुकत्याच प्रसिद्ध केलेल्या जगभरातील लोकप्रियतेच्या बाबतीत प्रसिद्ध नेत्यांच्या यादीनुसार भारतीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना ७५ टक्के इतक्या लोकांनी जगभरातून लोकप्रिय नेता म्हणून पसंती दर्शविली आहे. नुकतेच १७ ते २३ ऑगस्ट दरम्यान याबाबतीत सर्वे करण्यात आला होता. त्यानुसार आता २०२० नंतर पुन्हा एकदा २०२२ मध्ये नरेंद्र मोदी यांचा जागतिक लोकप्रिय नेते म्हणून अव्वलस्थानी क्रम लागला आहे.

असेच सुपरफास्ट अपडेट मिळवण्याकरिता या लिंकवर क्लिक करा 

Leave A Reply

Your email address will not be published.