Take a fresh look at your lifestyle.

नार्वेकरांचा बंगला तुटला, पुढचा हातोडा ‘या’ नेत्याच्या रिसॉर्टवर; सोमय्यांचा इशारा

0
maher

ओटीटी न्यूज नेटवर्क

मुंबई : मुंबईतील दहीहंडी कार्यक्रमात शिवसेनेचा भ्रष्टाचाराची दहीहंडी फोडणार असे सांगणारे भाजपचे नेते किरीट सोमय्या यांच्या तक्रारीमुळे शिवसेनेचे माजी आमदार अनिल परब यांच्यावर मोठी कारवाई होणार आहे. अनिल परब यांच्या रिसॉर्टवर केंद्रसरकारकडून कारवाईचे आदेश देण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.

महाराष्ट्रात एकनाथ शिंदे आणि भाजपची सत्ता आल्यानंतर किरीट सोमय्या पुन्हा अ‍ॅक्शन मोडमध्ये आले आहेत. शिवसेना नेते अनिल परब यांचे रिसॉर्ट लवकरच पाडण्यात येईल, असं ट्विट सोमय्यांनी केलंय. मिलिंद नार्वेकरांचा बंगला तुटला, आता अनिल परबांचे रिसॉर्ट तोडणार. सोमय्या यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे की, केंद्र सरकारच्या पर्यावरण विभागाने साई रिसॉर्ट आणि सी शंख रिसॉर्ट पाडण्याचे अंतिम आदेश दिले आहेत.

गहू आयातीची आवश्यकता नाही; केंद्र सरकारची स्पष्टोक्ती

महाराष्ट्र सरकार आता रत्नागिरीच्या जिल्हाधिकाऱ्यांना रिसॉर्ट पाडायला सांगणार. बांधकाम पाडण्याच्या प्रक्रियेला गती देण्यासाठी आपण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतल्याचेही सोमय्या यांनी सांगितले.

अनिल परब यांचे रिसॉर्ट बंद करण्याचा आदेश केंद्र सरकारच्या पर्यटन विभागाने जारी केला आहे. हे रिसॉर्ट पाडण्याचे आदेश महाराष्ट्र पर्यटन विभागाला मिळाले आहेत. त्यानुसार कारवाई केली जाईल. अनिल परब यांनी महाविकास आघाडी सरकारच्या काळात मंत्रिपदाचा गैरवापर केल्याचा आरोप त्यांनी केला.

असेच सुपरफास्ट अपडेट मिळवण्याकरिता या लिंकवर क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.