Take a fresh look at your lifestyle.

मोहीत कंबोज यांच्या रडारवर राष्ट्रवादी; ‘या’ बड्या महिला नेत्यांना दिला इशारा

0

ओटीटी न्यूज नेटवर्क

मुंबई : भाजप नेते मोहित कंबोज हे नेहमीच ट्विटच्या माध्यमातून चर्चेत असतात. काही दिवसांपूर्वी त्यांनी ट्विट करून राष्ट्रवादीच्या बड्या नेत्यावर कारवाई केली जाईल, असे म्हटले होते. त्यावरून त्यांची जोरदार चर्चा झाली. दरम्यान, आता त्यांनी पुन्हा राष्ट्रवादीवर टीका केली आहे. राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्षा विद्या चव्हाण यांना थेट आव्हान देणारे ट्विट केले आहे.

‘या’ प्रदेशाध्यक्षांचे मोठे विधान; राज्यात मध्यावधी निवडणुका अटळ

राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्षा विद्या चव्हाण यांनी अनेक मुद्द्यावरुन भाजपला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला आहे. आता मोहीत कंबोज यांनीही ट्विट करत, ‘विद्याताई जय श्रीराम’ असे म्हटले आहे. त्यांच्या या ट्विटनंतर आता राजकीय वर्तुळात नेमकं काय होणार, याबाबत तर्कवितर्क लढवले जात आहेत.

दरम्यान, बिल्किस बानो प्रकरणातील 11 जणांच्या सुटकेवर राष्ट्रवादी काँग्रेस आक्रमक भूमिका घेत आंदोलन करणार असल्याचे सांगण्यात आले. विद्या चव्हाण यांनी यासंदर्भात पत्रकार परिषदही घेतली. राष्ट्रवादीच्या या भूमिकेनंतर कंबोज यांनी ट्विट केल्यानंतरच नेमका इशारा काय आहे, हे येणारा काळच ठरवेल.

असेच सुपरफास्ट अपडेट मिळवण्याकरिता या लिंकवर क्लिक करा 

Leave A Reply

Your email address will not be published.