Take a fresh look at your lifestyle.

“राष्ट्रवादीला आणखी १५ वर्षे सत्तेसाठी तळमळावे लागेल”- शंभूराज देसाई

0

ओटीटी न्यूज नेटवर्क

मुंबई : शिंदे – फडणवीस सरकारने १०० हुन अधिक दिवस सत्ता स्थापनेला पूर्ण करत अनेक महत्वपूर्ण प्रश्न मार्गी लावले आहे, दुसरीकडे विरोधक मात्र टीका करण्यातच धन्यता मानत आहे. राज्यात दर दिवशी सत्ताधाऱ्यांवर विरोधक कुठल्यातरी मुद्द्यावरून शरसंधान करण्याची संधी शोधात असतात. आता वाद जुंपला आहे तो शिंदे गटाचे आमदार शंभूराज देसाई आणि राष्ट्रवादीच्या मेहबुब शेख तसेच दत्तानाना भरणे यांच्यात. दरम्यान शंभूराज देसाई यांनी टीका करताना म्हटले होते की, राष्ट्रवादी काँग्रेसला सत्तेत येण्याकरिता आणखी १५ वर्षे तरी तळमळावे लागणार.

खरचं ५० आमदारांना ‘खोके’ दिले का? मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी स्पष्ट करावे; ‘या’ नेत्याचे भावनिक आवाहन

नेमक्या याच टीकेला उत्तर देताना राष्ट्रवादीचे दत्तानाना भरणे व मेहबुबा शेख यांनी म्हटले होते की, पाटण निवडणुकीत पुढल्या वेळी शंभूराज देसाई निवडून येणार नाही. नेमका याच वक्तव्याचा देसाई यांनी खरपूस समाचार घेतला व म्हटले की, हजारोंच्या मतांनी निवडून आलेल्या लोकप्रतिनिधींना तुम्ही निवडून येणार नाही असे म्हणता, तुम्ही राष्ट्रवादीचे प्रवक्तेपद सोडून कुंडली भविष्य बघण्याचा व्यवसाय सुरु केला काय, असा खरमरीत सवालच देसाई यांनी राष्ट्रवादी प्रवक्ते मेहबूब शेख यांना केला.

सोनिया गांधी यांचे ऋषी सुनक यांना पत्र; म्हणाल्या, “भारतीयांना तुमचा सार्थ अभिमान”

एकंदरीतच शंभूराज देसाई यांनी केलेले विधान हे राजकीय वर्तुळात नव्या टीका टिप्पणीला ऊत आणणारे ठरू शकते, कारण राष्ट्रवादीला उद्देशून केलेले हे विधान असल्याने इतर नेत्यांच्या देखील यावर प्रतिक्रिया येऊ शकतात.

असेच सुपरफास्ट अपडेट मिळवण्याकरिता या लिंकवर क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.