Take a fresh look at your lifestyle.

मोठा अनर्थ टळला! राष्ट्रवादीचे आमदार संग्राम जगताप यांच्या कारला भीषण अपघात; थोडक्यात बचावले!

maher

ओटीटी न्यूज नेटवर्क

अहमदनगर – नगरमधून आताची सर्वात मोठी बातमी समोर आली असून आज पहाटे मुंबईजवळ नगरचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार संग्राम जगताप यांच्या गाडीला भीषण अपघात झाला. सुदैवाने, या अपघातातून आमदार संग्राम जगताप थोडक्यात बचावले आहेत. पुणे-मुंबई एक्स्प्रेस हायवेवर मुंबईपासून काही अंतरावर जगताप यांच्या वाहनाची एसटी बसला पाठीमागून जोरदार धडक बसली. या अपघातात त्यांच्या गाडीचा चक्काचूर झाला आहे. मात्र, सीट बेल्ट लावलेला असल्याने आणि अत्याधुनिक सुरक्षा असलेले वाहन असल्याने जगताप व त्यांचा चालक सुखरूप बचावले.

तुमच्या जिल्ह्याचे असेच सुपरफास्ट अपडेट मिळवण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

यावेळी, ‘नगरकर नागरिकांचे प्रेम आणि आशीर्वाद यामुळे आपण या भयंकर अपघातातून सुखरूप बचावलो,’ अशी प्रतिक्रिया आमदार जगताप यांनी पत्रकारांशी बोलतांना व्यक्त केली. यासंबंधी सविस्तर माहिती अशी कि, मुंबईतील कामासाठी जगताप कार्यकर्त्यांसह काल रात्रीच मुंबईला रवाना झाले होते. त्यातील काही कार्यकर्ते पुढे गेले होते. जगताप त्यांच्या बीएमडब्ल्यू एक्स ५ या गाडीतून निघाले होते. गाडीत आमदार जगताप आणि चालक दोघेच होते. रात्रीची वेळ असल्याने आमदार जगताप झोपेत होते. मुंबईच्या जवळ गेल्यावर रस्त्याचे काम सुरू असल्याने काही ठिकाणी लेन खोदून रस्ता वळवण्यात आला आहे.

SBI च्या ग्राहकांना महिनाभरात आणखी एक झटका; कर्जाच्या EMI सह ‘या’ गोष्टी देखील वाढणार!

जगताप यांच्या गाडीच्या पुढे एक एसटी बस जात होती. ती बस तिसऱ्या लेनमधून जात होती. मात्र, पुढे रस्ता बंद असल्याचे लक्षात आल्यावर एसटी चालकाने अचानकपणे लेन बदलून गाडी थेट पहिल्या लेनमध्ये आणली. त्यावेळी त्या लेनमधून जगताप यांचे वाहन भरधाव वेगाने जात होते. लेन बदलून अचानक एसटी बस पुढे आल्याने जगताप यांचा चालक गाडीवर नियंत्रण मिळवू शकला नाही. त्यामुळे कार बसवर मागील बाजूने धडकली.

अखेर प्रतीक्षा संपली; ‘या’ तारखेला जमा होणार पीएम किसान योजनेचा 11वा हप्ता

दरम्यान, या अपघातात जगताप यांच्या गाडीचे मोठे नुकसान झाले. मात्र, सुदैवाने सीट बेल्ट आणि सुरक्षा यंत्रणा यामुळे जगताप आणि त्यांच्या चालकाला दुखापत झाली नाही. अपघाताची माहिती कळताच पोलीस मदतीला आले. मुंबईला पुढे गेलेल्या कार्यकर्त्यांशी संपर्क करून त्यांना मागे बोलवण्यात आले. त्यानंतर दुसऱ्या वाहनातून जगताप पुढे रवाना झाले. आमदार जगताप यांना ओळखणारे अन्य वाहनांतील नागरिकही मदतीसाठी थांबले होते. एवढ्या मोठ्या अपघतातून सुखरुप बचावल्यानंतर जगताप पुढे मुंबईला गेले. सकाळपासून त्यांनी कार्यकर्त्यांसोबत तेथे भेटी गाठी आणि कामेही सुरू केली आहेत. जनतेच्या प्रेमामुळे आपण सुखरूप असून नगरच्या नागरिकांना काळजी करू नये, असंही आवाहन देखील जगताप यांनी नागरिकांना केलं आहे.

आता बारी मंत्री नारायण राणेंची; शरद पवार आणि मुख्यमंत्र्यांमध्ये खलबतं!

Comments are closed.