Take a fresh look at your lifestyle.

…तर ‘हा’ स्तंभ कोसळण्यास वेळ लागणार नाही; शरद पवारांनी व्यक्त केली भीती

0
maher

ओटीटी न्यूज नेटवर्क

लातूर – लातूरच्या उदगीर नगरीत ९५ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाला सुरुवात झाली आहे. छत्रपती शाहू महाराज सभागृहात व डॉ. ना.य. डोळे व्यासपीठावर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार यांच्या हस्ते सकाळी साहित्य संमेलनाचं उद्घाटन झालं. उद्घाटनापूर्वी सकाळी ८ वाजता छत्रपती शिवाजी चौकातून ग्रंथदिंडी काढण्यात आली होती. शरद पवार यांनी यावेळी बोलताना प्रोपागंडा साहित्य निर्मितीमुळे निरंकुशतेला निमंत्रण मिळत असून आपल्या देशात असाच विशिष्ट प्रोपागंडा पद्धतशीर पसरवला जात असल्याचं म्हटलं.

IMPORTANT: तुमचं Pan Card वापरून इतर कोणी loan घेतलंय का? ‘या’ सोप्या पद्धतीने तपासा

“राज्यकर्त्यांनी यासाठी साहित्य आणि माध्यमांची कमकुवत अंगे न्याहाळली आहेत. प्रसारमाध्यमांच्या बाबतीत त्यांनी अत्यंत हुशारीने कॉर्पोरेट जगाची मदत घेतली आहे. चित्रपट क्षेत्रातही त्याचा शिरकाव झाला आहे. हाच कॉर्पोरेटीकरणाचा प्रयोग आता साहित्यात होत आहे. तोट्यात असलेल्या प्रकाशन संस्था त्यांनी ताब्यात घेतल्या आहेत. हे असेच सुरु राहिले तर चौथा स्तंभ कोसळण्यास वेळ लागणार नाही. हे टाळायचे असेल तर साहित्यिकांना डोळ्यात तेल घालून दक्ष रहावे लागेल,” असं शरद पवार म्हणाले.

शरद पवार म्हणाले की, विशिष्ट विचारधारेला (Ideology) पोषक ठरेल अश्या साहित्यनिर्मितीवर आजच्या काळात काही घटकांकडून भर देण्यात येतोय. हा प्रकार म्हणजे लोकशाहीसाठी धोक्याची घंटा आहे. समाजकारणी आणि राजकारणी यांच्या साहित्यातून (Literature) विचारधारा जन्माला येत असतात.

आता बँक खात्यात पैसे नसतील तरी काढता येतील 10,000 रुपये; जाणून घ्या सरकारची नवीन योजना

याच विचारधारेतून गांधीवाद, मार्क्सवाद, आंबेडकरवाद, समाजवाद, राष्ट्रवाद आदी वाद जन्माला आल्याचेही पवार म्हणाले. मात्र, सध्याच्या काळात ठराविक विचारधारेला पोषक साहित्यनिर्मितीवर काही घटक भर देत असून, अशा प्रकारची साहित्य निर्मिती ही निरंकुशतेला निमंत्रण देत असून, अराजकता माजवण्यास कारणीभूत ठरत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.