Take a fresh look at your lifestyle.

Video: नॅशनल रेकॉर्ड तोडत नीरज चोप्राचा भाला पुन्हा सुसाट; डायमंड लीगमध्ये जबरदस्त फेकी

maher

ओटीटी न्यूज नेटवर्क

नवी दिल्ली – टोकियो ऑलिम्पिकमध्ये भालाफेक स्पर्धेत भारताला पहिले सुवर्णपदक मिळवून देणारा स्टार अॅथलीट नीरज चोप्राने नव-नवीन विक्रमांची नोंद करणे सुरूच ठेवले आहे. या स्टार खेळाडूने स्वीडनमध्ये सुरू असलेल्या डायमंड लीगच्या स्टॉकहोम मोसमात 89.94 मीटरची विक्रमी फेक करून नवा राष्ट्रीय विक्रम केला आहे. सुमारे 15 दिवसांपूर्वी या 24 वर्षीय खेळाडूने फिनलंडमध्ये झालेल्या पावो नूरमी गेम्समध्ये 89.30 मीटरपेक्षा जास्त फेक करून राष्ट्रीय विक्रम केला होता. नीरजने आता दुसऱ्यांदा 89 मीटरचा टप्पा गाठला आहे. त्याने टोकियो ऑलिम्पिकमध्ये 88.07 मीटर फेक करून सुवर्णपदक जिंकले होते.

ठाकरेंना मोठा धक्का! सरकारमध्ये येताच फडणवीसांचा मोठा निर्णय

नीरजसाठी ही कामगिरी या महिन्यात होणाऱ्या जागतिक अजिंक्यपद स्पर्धेच्या पार्श्वभूमीवर आत्मविश्वास वाढवणारी ठरेल. अमेरिकेत होणाऱ्या वर्ल्ड चॅम्पियनशिपपूर्वी नीरज चोप्रासाठी ही सर्वात मोठी स्पर्धा आहे. यामध्ये टोकियो ऑलिम्पिकचे तीनही पदक विजेते रिंगणात आहेत. सध्याच्या काळातील भालाफेकपटूंमध्ये बर्‍याच वेळा 90 मीटरपर्यंत भाला फेकणारा जर्मनीचा जोहान्स वेटर दुखापतीमुळे बाहेर आहे.

केवळ ‘या’ कारणामुळे फडणवीसांनी उपमुख्यमंत्रिपद स्वीकारलं – शरद पवार स्पष्टच बोलले

डायमंड लीगमध्ये भाग घेणारा एकमेव भारतीय –

नीरज चोप्रा यांने 7 डायमंड लीग खेळल्या आहेत. त्यापैकी तीन 2017 मध्ये आणि चार 2018 मध्ये खेळल्या गेल्या. जरी त्याला डायमंड लीगमध्ये पदक मिळविता आले नसले तरी दोनदा तो पदक गमावून चौथ्या क्रमांकावर राहिला आहे.

राष्ट्रीय विक्रम मोडण्याबरोबरच चोप्राने डायमंड लीगमधील कामगिरीही सुधारली आहे. ऑगस्ट 2018 मध्ये झुरिचमध्ये झालेल्या स्पर्धेत 85.73 मीटर थ्रोसह चौथे स्थान मिळवल्यानंतर चोप्रा प्रथमच डायमंड लीग खेळणार आहे.

असेच सुपरफास्ट अपडेट मिळवण्यासाठी या लिंकला क्लिक करा

Comments are closed.