Take a fresh look at your lifestyle.

गाडीच्या नंबर प्लेटबद्दल केंद्र सरकारने आणली ‘हि’ योजना ; जाणून घ्या अपडेट …

0

ओटीटी न्यूज नेटवर्क

नवीदिल्ली : आता राज्य बदलल्यास वाहन क्रमांक बदलण्याची आवश्यकता भासणार नाही. एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी बदली होणाऱ्या लोकांना या समस्यांना सामोरं जावे लागतं होते. त्यासाठी आता बीएच सीरीज नंबर प्लेट आणि नोंदणी सुरू झाली आहे.

एक भारत, एक टॅक्स, एक नंबर प्लेट
रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार ही मालिका अशा लोकांसाठी सुरू केली आहे, ज्यांची नोकरीनिमित्ताने वेगवेगळ्या राज्यांमध्ये बदली होते. आजच्या काळात कामामुळे लोकांना अनेकदा एका राज्यातून दुसऱ्या राज्यात जावे लागते. केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांना विशेषत: संरक्षण क्षेत्रातील कर्मचाऱ्यांना यामध्ये विशेष प्राधान्य दिले गेलं आहे. राज्य सरकारी कर्मचाऱ्यांशिवाय खासगी क्षेत्रातील मोठ्या कंपन्यांचे कर्मचारीही या BH-Series चा लाभ घेऊ शकतील. 4 किंवा अधिक राज्ये/केंद्रशासित प्रदेशांमध्ये कार्यालये असलेल्या खाजगी क्षेत्रातील कंपन्यांचे कर्मचारी याचा लाभ घेऊ शकतात. या मालिकेचा फॉरमॅट अशा प्रकारे असेल, नंबर प्लेटवर पहिले वर्ष लिहिलं जाईल. यानंतर भारत म्हणून BH लिहिलं असेल आणि त्यानंतर वाहन क्रमांक असेल.

काय आहे BH नंबर प्लेट ?
नवीन वाहन खरेदी करताना, ग्राहक डीलर वाहन पोर्टलद्वारे BH नंबर प्लेटसाठी अर्ज करू शकतो. BH नंबर प्लेट नेहमीच्या नंबर प्लेट सारखीच आहे.  पांढऱ्या पट्टीवर काळी अक्षरं आहेत, पण आताच्या नंबर प्लेटच्या नेमकी उलट ही नंबर प्लेट आहे. म्हणजे ज्या वर्षात तुम्ही वाहन घ्याल ते वर्ष (उदा. आताचं वर्ष 22), त्यानंतर ‘BH’ म्हणजे भारत, त्यानतंर वाहन क्रमांक आणि ‘A’ म्हणजे वाहन श्रेणी. उदा. 22 BH 0756 A (वर्ष, भारत, वाहन क्रमांक, श्रेणी) बीएच नंबर प्लेट मिळविण्याची प्रक्रिया ऑनलाइन आहे.

किती शुल्क भरावे लागणार?
या नवीन सीरिजमध्ये 10  लाख रुपयांपेक्षा कमी किमतीच्या वाहनांवर 8 टक्के शुल्क भरून बीएच सीरिजचा क्रमांक मिळवता येईल. जर वाहनाची किंमत 10 लाख ते 20 लाख रुपयांपर्यंत असेल तर या सीरिजवरवर 10 टक्के दराने शुल्क आकारलं जाईल. बीएच सीरीजसाठी, वाहनाची किंमत 20 लाख रुपयांपेक्षा जास्त असल्यास 12 टक्के शुल्क भरावे लागेल.

Leave A Reply

Your email address will not be published.