Take a fresh look at your lifestyle.

राज्यात उन्हाचा तडाखा कायम – विदर्भासह मराठवाड्यात ५ दिवस उष्णतेची लाट; ‘या’ ठिकाणी बरसणार पाऊस

0

ओटीटी न्यूज नेटवर्क

मुंबई – गेल्या काही दिवसांपासून देशासह महाराष्ट्रात उन्हाचा तडाखा कायम आहे. मार्च संपून देखील उष्णतेची लाट राज्यात कायम आहे. जवळपास एक शतकानंतर इतका कडक उन्हाळा आणि जागतिक तापमान वाढ विचारात घेता या मार्च महिन्यात रेकॉर्ड ब्रेक तापमान वाढ झाली आहे. विशेष म्हणजे एप्रिल महिन्यात देखील ही तापमान वाढ सुरूच असून राज्यातील अनेक ठिकाणी तापमान 40च्या पार गेले आहे.

पॅन कार्ड आधार कार्डशी लिंक आहे का? नसल्यात आता भरा इतका दंड…

नागरिक देखील या वाढत्या उन्हामुळे कमालीचे हैराण होत आहेत. नुकताच पश्चिम महाराष्ट्रात काही ठिकाणी पावसाच्या जोरदार सारी कोसळल्या. ज्यामुळे त्या भागातील नागरिकांना काहीसा दिलासा मिळाला. मात्र पुन्हा परिस्थिती उन्हाच्या बाबतीत ‘जैसे थे’ झाली असून उष्णतेची लाट कायम आहे. असे असतानाच मराठवाड्यात पुढील दोन दिवस उष्णतेची लाट कायम राहिल, असा अंदाज भारतीय हवामान विभागाने वर्तवला आहे. विशेष म्हणजे विदर्भात ही पुढचे पाच दिवस ही उष्णतेची लाट कायम राहील अशी माहिती भारतीय हवामान विभागाचे प्रमुख के. एस. होसाळीकर यांनी दिलीय.

पुढील 5 दिवसांत हिमाचल प्रदेश, विदर्भ आणि बिहारच्या वेगळ्या भागांमध्ये उष्णतेची लाट असणार आहे. तर पुढील दोन-तीन दिवसांत मध्य महाराष्ट्र आणि जम्मूमध्ये; झारखंडमध्ये 6-8 एप्रिल दरम्यान; दक्षिण पंजाबमध्ये 7-10 एप्रिल दरम्यान; छत्तीसगडमध्ये 9-10 एप्रिल रोजी उष्णतेची लाट पाहायला मिळणार आहे.

पराभवानंतरही राजस्थान पहिल्या स्थानी, आयपीएल मध्ये कुठला संघ कुठल्या स्थानावर जाणून घ्या

येत्या ४८ तासांत उत्तर मध्य महाराष्ट्र आणि विदर्भाच्या काही भागात उष्णतेची लाट येण्याची शक्यता आहे. दक्षिण मध्य महाराष्ट्राच्या काही भागात गडगडाटासह हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे. तर आज कोल्हापूर, सांगली, सातारा, सोलापूर, उस्मानाबाद, लातूर येथे वादळी पावसाने हजेरी लावली. तसेच सांगलीत काही ठिकाणी गारपीट झाली.

 

Leave A Reply

Your email address will not be published.