Take a fresh look at your lifestyle.

Electric Scooter पुण्यात ‘या’ स्कूटर आणि ऑटो आणा; नितीन गडकरींचं अजित पवारांना आवाहन

maher

ओटीटी न्यूज नेटवर्क

पुणे – Electric Scooter वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटतर्फे (Sugar instutute)पुणे येथे राज्यस्तरीय साखर परिषद २०२२ (Sugar Summit 2022) आयोजित करण्यात आली होती. यावेळी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, उपमुख्यमंत्री अजित पवार तसेच इतर मान्यवर उपस्थित होते. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी नेहमीच सर्वसामान्यांना प्रोत्साहन मिळावे तसेच पेट्रोल डिझेल सारख्या महाग इंधनाना पर्याय उपलब्ध व्हावा यासाठी प्रयत्नशील असतात. मागच्या अनेक वर्षांपासून ऑटो सेक्टरमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे आणि चांगले बदल घडवून आणण्यासाठी नितीन गडकरी (Nitin Gadkari)प्रयत्न करत आहेत.

महाराष्ट्रात काही जिल्ह्यांत पाऊस तर काही ठिकाणी उष्णतेची लाट; वाचा संपूर्ण आठवड्याचं हवामान एका क्लिकवर

देशातील जनता महागाईने त्रस्त आहे. अशातच, पेट्रोल डिझेल (Petrol- Diesel)तसेच इंधनांच्या सततच्या वाढत्या किमतींमुळे सर्वसामान्य लोकांच्या खिशाला कात्री लागत आहे. दरम्यान, नागरिकांसाठी पेट्रोल डिझेलला पर्यायी इंधन उपलब्ध करणे, या पर्यायी इंधनावर चालणारी वाहनं, इलेक्ट्रिक वाहनं बनवण्यास कंपन्यांना प्रोत्साहन देणे अशा गोष्टी गडकरी सातत्याने करत असतात. बऱ्याचदा वाहन कंपन्यांना वेगवेगळे प्रयोग करायला लावत असतात, जेणेकरून देशातलं प्रदूषण कमी होण्यास मदत होईल. याचंच आणखी एक उदाहरण शनिवारी पुण्यात पाहायला मिळालं.

झटपट पर्सनल लोन हवं आहे का? मग या महत्वाच्या गोष्टी ध्यानात ठेवाच

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी शनिवारी सांगितलं की, ते वाहन उत्पादक कंपन्या, जसे की, बजाज (Bajaj), टीव्हीएस (TVS) आणि हिरो (Hero) यांना पुण्यात पूर्णपणे इथेनॉलवर चालणाऱ्या स्कूटर-ऑटो (Ethenol)आणण्याचे आवाहन करतील. पुण्यात वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटतर्फे आयोजित राज्यस्तरीय साखर परिषद २०२२ मध्ये गडकरी बोलत होते.

वाह! आता फक्त ५,९९९ रुपयांमध्ये घरी आणा ‘हा’ HD LED TV; जाणून घ्या या बंपर सेलविषयी

गडकरी पुढे म्हणाले की बजाज, टीव्हीएस आणि हिरो या कंपन्यांनी मोटारसायकल आणि ऑटोमध्ये फ्लेक्स इंजिन आणले आहेत. डिझेलवर आधारित शेतीची उपकरणे पेट्रोलवर आधारित असावीत आणि फ्लेक्स इंजिन इथेनॉलवर चालवण्यासाठी कन्वर्ट करता येतील. या संमेलनात गडकरी यांनी वाढते प्रदूषण आणि उर्जेच्या अपारंपरिक स्रोतांचा अभाव याला तोंड देण्यासाठी पर्यायी इंधनाच्या वापरावर भर देण्यास सुचवले.

केवळ 70 हजार डाउन पेमेंटवर बलेनो कार घरी आणा; महिन्याला भरा फक्त इतका EMI

गडकरी म्हणाले की, “मी पंतप्रधानांशी बोललो आणि पुण्यात इंडियन ऑईलचे (Indian Oil) ३ इथेनॉल पंप आले, पण त्यातील एक थेंबही विकला गेला नाही. त्यामुळे मला अजित पवारांना विनंती करायची आहे, चला आपण यावर एकत्र काम करूया असं आवाहन त्यांनी उपमुख्यमंत्र्यांना दिलं.

असेच सुपरफास्ट अपडेट मिळवण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

Comments are closed.