Take a fresh look at your lifestyle.

इलेक्ट्रिक वाहनांबाबत नितिन गडकरी यांची जबरदस्त घोषणा; कार-बाईकचालकांमध्ये आनंदाचे वातावरण

0

ओटीटी न्यूज नेटवर्क

नवी दिल्ली – सध्या जगभरासह भारतातही इलेक्ट्रिक वाहनांची (Electric vehicle)एक वेगळीच क्रेझ पाहायला मिळते. पेट्रोल तसेच डिझेलच्या वाढत्या किमती बघता नागरिकांमध्ये कमालीचा नाराजीचा सूर पाहायला मिळतोय. एकंदरीत इलेकट्रीक वाहनांची वाढती मागणी बघता येणार काळ हा इलेक्ट्रिक गाड्यांचा असेल असं म्हणता येईल. हे लक्षात घेऊनच अनेक कंपन्यांनी इलेक्ट्रिक वाहनांचे उत्पादन वाढवले आहे.

असेच सुपरफास्ट अपडेट मिळवण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

जर तुम्हीदेखील इलेक्ट्रिक वाहन खरेदी करण्याच्या तयारीत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी अत्यंत महत्वाची आहे. कारण, पुढील दोन वर्षांत इलेक्ट्रिक वाहनांच्या किमती पेट्रोल वाहनांच्या बरोबरीने असतील अशी घोषणाच केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari)यांनी मंगळवारी केली.

हेही वाचा – औरंगाबाद : दोन समलिंगी मैत्रिणींमध्ये जडलं प्रेम, त्यानंतर घडलं असं काही…

इलेक्ट्रिक वाहनांची किंमत होणार कमी

तंत्रज्ञान आणि हरित इंधनातील प्रगती या कारणांमुळे देशात इलेक्ट्रिक वाहनांच्या किमती कमी होतील. ज्यामुळे येत्या दोन वर्षांत इलेक्ट्रिक वाहनांची किंमत पेट्रोलवर चालणाऱ्या वाहनांच्या बरोबरीने होईल. ही बाब देशभरातील वाहन वापरकर्त्यांसाठी क्रांती ठरेल.

हेही वाचा – जिल्हा परिषदेच्या शाळेतच माजी उपसरपंच आणि शिक्षण समिती अध्यक्षामध्ये हाणामारी, पहा व्हिडिओ…

प्रदूषणाची पातळीही कमी

नितीन गडकरी मंगळवारी लोकसभेत रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाच्या 2022-23 च्या अनुदानाच्या मागण्यांवर उत्तर देत होते. यावेळी प्रभावी स्वदेशी इंधनाकडे जाण्याच्या गरजेवर भर देऊन लवकरच इलेक्ट्रिक इंधन प्रत्यक्षात येईल अशी आशा गडकरींनी केली. दरम्यान, या प्रकारच्या इंधनामुळे प्रदूषणाची पातळी कमी होईल असंही त्यांनी म्हटलं.

हेही वाचा – रेशन दुकानदारांसाठी आनंदाची बातमी, राज्य सरकारने घेतला मोठा निर्णय!

हायड्रोजन तंत्रज्ञानाचा अवलंब करण्याचा आग्रह

याचवेळी हायड्रोजन तंत्रज्ञानाचा अवलंब खासदारांनी करावा, असं आवाहन देखील गडकरींनी केलंय. त्यांनी खासदारांना आपापल्या भागातील सांडपाणी ग्रीन हायड्रोजनमध्ये बदलण्यासाठी पुढाकार घेण्यास सांगितले. लवकरच हायड्रोजन हा सर्वात स्वस्त इंधन पर्याय असेल असंही ते यावेळी बोलताना म्हणाले.

हेही वाचा – बैलगाडा शर्यत जिंकली पण मृत्यूने मात्र हरवलं, ‘असा’ झाला बैलगाडा मालकाचा मृत्यू!

बरोबरीची किंमत

लिथियम आयन बॅटरीच्या किमती झपाट्याने कमी होत आहेत. आपण झिंक-आयन, अॅल्युमिनियम-आयन, सोडियम-आयन बॅटरी विकसित करीत आहोत. जास्तीत जास्त दोन वर्षात इलेक्ट्रिक स्कूटर, कार, ऑटो रिक्षाची किंमत ही पेट्रोलवर चालणारी स्कूटर, कार, ऑटो रिक्षाच्या बरोबरीची असेल, असंही त्यांनी सांगितलं.

Leave A Reply

Your email address will not be published.