Take a fresh look at your lifestyle.

रिफायनरीसाठी पुढाकार घ्या; नितीन गडकरींचे सूचनावजा आवाहन

0
maher

ओटीटी न्यूज नेटवर्क

नागपूर : सात वर्षांपासून नाणारमधील प्रस्तावित रिफायनरी स्थलांतरित करण्याची चर्चा पुन्हा सुरू आहे. या संदर्भात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी इंडियन ऑईल कॉर्पोरेशनचे अध्यक्ष श्रीकांत वैद्य यांना नागपुरात रिफायनरी आणि पेट्रोकेमिकल कॉम्प्लेक्स उभारण्यासाठी पुढाकार घेण्याचे आवाहन केले. पेट्रोलियम मंत्री राज्य आणि केंद्र स्तरावरील संबंधित अधिकारी आणि गुंतवणूकदारांची तातडीने बैठक घेऊ शकतो, असेही गडकरी म्हणाले.

रिफायनरी व पेट्रोलियम कॉम्प्लेक्ससाठी वैद्यच्यावतीने अध्यक्ष शिवकुमार राव, उपाध्यक्ष प्रदिप माहेश्वरी, नवीन मालेवार हे पाठपुरावा करत आहेत. केंद्रीय मंत्री गडकरींच्या पत्रामुळे त्यांच्या मागणीला बळ मिळाले. भाजपा नेते आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने सात महिन्यांपूर्वी तत्कालीन पेट्रोलियम मंत्री धर्मेंद्र प्रधान यांना तांत्रिक आणि आर्थिक व्यवहार्यता अहवाल तयार करण्यास सांगितले होते. त्यांनी आश्वासन दिल्यानंतर लगेच केंद्राकडून ते सुरू झाले नाही. दुसरीकडे नितीन गडकरींनी नागपुरात रिफायनरीसाठी नव्याने प्रयत्न सुरू केले आहेत.

केंद्रीय मंत्री हरदीपसिंग पुरी विदर्भात रिफायनरी उभारण्यासाठी संपर्कात आहेत. नागपुरात जमीन उपलब्ध झाल्यास प्रकल्प उभारण्याच्या तयारीला पाठिंबा दर्शविला आहे. नागपूर जिल्ह्यातील कुहीजवळ १५ हजार एकर जमीन उपलब्ध आहे. नाणारच्या तुलनेत मुबलक पाणी स्वस्त दरात उपलब्ध होणार आहे. त्याजवळ ड्रायपोर्ट असल्याने पेट्रोलियम आणि केमिकल उत्पादनांची आयात-निर्यात वाढेल, असा विश्वास व्यक्त करत अनेक महामार्ग नागपुरातून जातात. पाइपलाइनच्या माध्यमातूनही उत्पन्न मिळेल, याकडे नितीन गडकरी यांनी लक्ष वेधले.

Leave A Reply

Your email address will not be published.