Take a fresh look at your lifestyle.

नितीन गडकरींचे आगामी निवडणुकी संदर्भात सूचक विधान

0

ओटीटी न्यूज नेटवर्क

मुंबई : भाजपचे दिग्गज नेते व केंद्रीय मंत्री नितीन गडकरी त्यांच्या कार्यशैलीमुळे व रोखठोक विधानाने नेहमीच चर्चेत असतात. मुद्दा विकासाचा असो की राजकीय घडामोडींचा गडकरी नेहमी स्पष्टवक्तेपणाला महत्व देतात. भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारणीतून नितीन गडकरी यांचे नाव वगळल्याने उलट सुलट चर्चाना उधाण आले होते. नुकतीच’ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ लोकल सेल्फ गर्व्हमेंट’ च्या दीक्षांत कार्यक्रमाप्रसंगी गडकरी यांनी हजेरी लावली होती. यावेळी त्यांनी सूचक विधान केले आहे.

हलाल पद्धती विरोधात मनसे आक्रमक; पंतप्रधान मोदींना करणार बंदीची मागणी

कार्यक्रमाप्रसंगी बोलताना गडकरी म्हणाले की, जनतेला कार्य करणाऱ्या व्यक्ती हव्या असतात. शेवटी लोक त्याच व्यक्तीला निवडून देतात जो त्यांना हवा असतो. आजपर्यंत मी कधीच कुणाच्या गळ्यात हार घातला नाही. यापुढे होणाऱ्या निवडणुकीत कार्यकर्त्यांना चहापाणी, पोस्टरबाजी व कटआऊट असला कुठलाही प्रकार करणार नसल्याचे मत त्यांनी व्यक्त केले. जनता ठरवेल की मला मत द्यायचे की नाही, ज्यांना मला मत द्यायचे ते देतील, अन्यथा नाही देतील. परंतु शेवटी विश्वास वाटतो की जनता मलाच मत देतील, अशा भावना देखील त्यांनी यावेळी बोलून दाखविल्या.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे लवकरच राज्यभर दौरा करणार!

तंत्रज्ञान काय करू शकते हे आपण सर्वांनी आजपर्यंत बघितले असून पावसाळ्यात होणाऱ्या त्रासांपासून मुक्तता मिळविण्यासाठी उत्कृष्ट दर्जाचे नियोजन व जागतिक स्तराचे तंत्रज्ञान महानगरपालिका व नगरपालिका यांना दिल्यास नक्कीच लाभ होईल असे गडकरी म्हणाले. आतापर्यंत ४५ लाख कोटींचे विकास कामे केल्याचा उल्लेख देखील त्यांनी या कार्यक्रमाप्रसंगी केला.

असेच सुपरफास्ट अपडेट मिळवण्याकरिता या लिंकवर क्लिक करा 

Leave A Reply

Your email address will not be published.