Take a fresh look at your lifestyle.

नितीश कुमार सरकार अल्पावधीतच कोसळेल – रामदास आठवले

0

ओटीटी न्यूज नेटवर्क

मुंबई : बिहारमधील सत्तापरिवर्तनावर विविध राजकीय प्रतिक्रिया उमटल्या असून आता केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी त्यांची प्रतिक्रिया दिली आहे. रामदास आठवले म्हणाले की, यापूर्वी नितीश कुमार, लालू प्रसाद यादव यांच्या पक्षासोबत युतीत होते, नंतर त्यांनी भाजप सोबत युती केली आणि आता परत राष्ट्रीय जनता दलासोबत युती केली आहे. परंतु या सरकारमधील आमदार फुटतील व हे सरकार पडेल, असा दावा आठवले यांनी केला.

मी गेलो की सरकार जातं, मी आलो की सरकार येतं- आमदार प्रा. राम शिंदे

पुढे बोलताना रामदास आठवले म्हणाले की, भाजप हा पक्ष मित्रपक्षांना संपवितो असा आरोप लावण्यात येतो परंतु माझ्या बाबतीत भाजपसोबत युती फायदेशीर ठरली. यामुळे माझ्या पक्षवाढीला बळच मिळाले. त्यामुळे भाजपवर विरोधी पक्षांकडून लावण्यात येणारे आरोप साफ खोटे व बिनबुडाचे असल्याचे मत आठवले यांनी व्यक्त केले.

शिंदे-फडणवीस सरकारचे मोठे निर्णय; नेमकी घोषणा काय? वाचा सविस्तर…

देशांत नरेंद्र मोदी यांचे नेतृत्व खंबीर असून त्यांच्यापुढे शरद पवार, ममता बॅनर्जी, नितीश कुमार, राहुल गांधी कुणीही टिकणार नाही असे रोकठोक मत आठवले यांनी मांडले. सोबतच एकनाथ शिंदे यांची ‘खरी शिवसेना’ आहे तर उद्धव ठाकरेंची ‘बरी शिवसेना’ आहे असा मिश्किल टोलादेखील रामदास आठवले यांनी लगावला.

असेच सुपरफास्ट अपडेट मिळवण्याकरिता या लिंकवर क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.