Take a fresh look at your lifestyle.

शिवसेना संपेल या भ्रमात कुणीही राहू नये ; सामनातून भाजप व शिंदे गटावर ‘टीकास्त्र’

0

ओटीटी न्यूज नेटवर्क

मुंबई : उद्धव ठाकरे यांची शिवसेना दिवसागणिक संपत असून राज्यातील विविध जिल्ह्यात शिवसेनेला खिंडार पडताना दिसत आहे. दसरा मेळावा असो की अन्य कुठलाही मुद्दा शिंदे गट व उद्धव ठाकरे गट यांच्यात नेहमीच खडाजंगी बघायला मिळते. भाजपच्या सोबतीने राज्यात शिंदे गटाने स्थापन केलेले सरकार, महाविकास आघाडी घटक पक्षांच्या चांगलेच जिव्हारी लागले असून वेळोवेळी आरोप-प्रत्यारोप होताना दिसून येतात. मध्यंतरी वेदांत फॉक्सकॉन मुद्द्यामुळे उद्धव ठाकरे गट व महाविकास आघाडीचे घटक पक्ष चांगलेच आक्रमक झालेले बघायला मिळाले होते. आता शिवसेनेनेने आपले मुखपत्र असलेल्या सामनातून भाजप व शिंदे गटावर कडाडून टीका केली आहे. यावेळी सामनामध्ये मजकुरात नमूद करण्यात आले की, गेली ५६ वर्षे शिवसेनेला संपविण्याचे प्रयत्न झाले परंतु स्थिती उलट झाली. शिवसेना दरवेळी नव्या जोमाने उभी राहिली. राज्यातील ४० बेईमानांच्या मदतीने जे सरकार स्थापन झाले आहे, त्यामुळे शिवसेना संपेल अशा भ्रमात कुणीही राहू नये.

पाम तेलाबद्दल जनजागृतीला गती मिळणार; देशभरातील व्यापाऱ्यांची एकजूट

स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे असताना देखील पाठीत खंजीर खुपसण्याचे प्रयत्न झाले होते मात्र दरवेळी हे वार पचविण्यात आले व शिवसेना पुढे वाढली. इतिहासात तोतयांचे बंड प्रसिद्ध आहे त्याचा अभ्यास या सर्व गद्दार मंडळींनी करणे आवश्यक आहे पाठीमागून वार करा अन्यथा आमनेसामने या शिवसेना पूर्ण ताकदीनिशी लढण्यास तयार असल्याचे मत यावेळी सामना लेखात नमूद करण्यात आले. दसरा मेळावा शिवतीर्थावर घेण्याचा प्रयत्न व यामुळे बाळासाहेबांना आव्हान देण्याची मजल या दळभद्री लोकांची झाली. कमळाबाईच्या नादाला लागून खऱ्या शिवसेनेचा नाद करायचा नाही कारण जो कमळाबाईच्या नादाला लागला त्याचा कार्यभार संपला म्हणून समाजा, अशा खोचक शब्दात सामानातून शिंदे गट व भाजपला डिवचण्यात आले.

पाकिस्तान जिंदाबाद घोषणाबाजी प्रकरण : मुख्यमंत्री मोठी कारवाई करणार

सामाना मुखपत्रातील या टीकेवर सत्ताधारी पक्षांकडून नक्कीच आक्रमक प्रतिक्रिया येणार हे नक्की आहे कारण यापूर्वी जेव्हा भाजपचा उल्लेख कमळाबाई म्हणून करण्यात आला होता तेव्हा मुंबई भाजपचे अध्यक्ष आशिष शेलार आक्रमक झाले होते. आता यावेळी नेमके काय प्रत्युत्तर मिळते हे बघणे महत्वाचे ठरणार आहे.

असेच सुपरफास्ट अपडेट मिळवण्याकरिता या लिंकवर क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.