Take a fresh look at your lifestyle.

ईडीच्या भीतीनं कुणीही आमच्याकडे किंवा भाजपात जावू नये; एकनाथ शिंदेंचं आवाहन

0

ओटीटी न्यूज नेटवर्क

औरंगाबाद : मुख्यमंत्री एकनाथ विकास शनिवारपासून औरंगाबाद दौऱ्यावर आहेत. त्यांनी आज औरंगाबादहून विरोधकांवर निशाणा साधलाय. भाजप आणि शिंदे गट हे ईडी आणि इतर तपास यंत्रणांच्या बळाचा वापर करत आहेत. त्यामुळे अनेकजण शिंदे गट आणि भाजपमध्ये सामील होत असल्याचा आरोप विरोधक करत आहेत. या आरोपाला एकनाथ शिंदे यांनी प्रत्युत्तर दिलंय.

मी शिवसेना सोडणार नाही, मरेन पण…; ईडीची धाड पडताच राऊतांची पहिली प्रतिक्रिया

याचबरोबर, एकनाथ शिंदे यांनी खासदार संजय राऊत यांच्यावर ईडीकडून सुरू असलेल्या कारवाईचं समर्थनदेखील केलंय. संजय राऊत हे महाविकास आघाडीचे मोठे नेते आहेत, रोज सकाळी 9 वाजता ते माध्यमांसमोर संवाद साधतात. ते आमच्यावर ईडीचा आरोप करत आहेत. पण माझा प्रश्न आहे की, त्यांना कोणी भाजपात बोलावलं का? जर कुणी ईडीच्या भीतीनं आमच्याकडे येत असेल किंवा भाजपामध्ये जात असेल, तर त्यांनी जाऊ नये, असे आवाहन एकनाथ शिंदे यांनी केलंय.

सकाळ खराब करणाऱ्याचीच आज सकाळ खराब, बरं वाटतंय – नितेश राणे

खोतकर असोत वा अन्य कोणीही, ईईडीच्या कारवाईला घाबरून, भिवून, दडपणाखाली कुणीही असं पुण्याचं काम करू नका. आम्ही एवढं मोठं सरकार बनवलं आणि सगळं झालं. ज्या घडामोडी पाहिल्या त्यात एक तरी सुडाची कारवाई पाहिली का? आमच्यावर ईडीचा दबाव होता म्हणून आम्ही शिंदे गटात गेलो, असे आतापर्यंत एका आमदारानेही म्हटले आहे का? असा सवाल एकनाथ शिंदे यांनी उपस्थित केला आहे. तसेच, सध्याचा कालावधी पूर्ण केल्यास पुन्हा बहुमताने निवडून येऊ, असा विश्वासही एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला आहे.

असेच सुपरफास्ट अपडेट मिळवण्याकरिता या लिंकवर क्लिक करा 

Leave A Reply

Your email address will not be published.