Take a fresh look at your lifestyle.

फक्त सेनेलाच नाही तर राष्ट्रवादीलाही फटका; नवी मुंबईत राष्ट्रवादीत मोठं भगदाड

0
maher

ओटीटी न्यूज नेटवर्क

मुंबई : एकनाथ शिंदे यांच्यासह ५० आमदारांनी महाविकास आघाडीतून माघार घेतल्याने राज्यातील महाविकास आघाडीचे सरकार कोसळले. त्यांनतर शिवसेनेला गळती लागली. आमदारांनंतर अनेक खासदार, नगरसेवक, अधिकाऱ्यांनी सेनेला सोडचिठ्ठी देऊन शिंदे गटात जाण्याचा निर्णय घेतला. मात्र, एकनाथ शिंदे यांच्या या बंडाचा फटका शिवसेनेलाच नाही तर राष्ट्रवादी काँग्रेसलाही बसल्याचे दिसून येत आहे.

वेदांत-फॉक्सकॉन प्रकरणामुळे विरोधक आक्रमक; सरकारची कोंडी करण्याचा प्रयत्न

याचा परिणाम म्हणजे नवी मुंबईत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मोठं भगदाड पडलं आहे. दोन माजी नगरसेवकांसह अनेक पदाधिकारी एकनाथ शिंदे गटात दाखल झाले आहेत. जिल्हाध्यक्ष, नगरसेवक अशोक गावडे, नगरसेविका स्वप्ना गावडे यांच्यासह दीडशे ते दोनशे अधिकारी, कामगारांनी शिंदे गटात प्रवेश केला आहे.

मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा; राज्यात दिवाळीही जोरात साजरी होणार

यामध्ये राष्ट्रवादीचे जिल्हाप्रमुख तथा माजी नगरसेवक अशोक गावडे, माजी नगरसेविका स्वप्ना गावडे, सानपाड्याचे तालुकाध्यक्ष रवींद्र ढोबळे, कोपरखैरणेचे तालुकाध्यक्ष मोहन पडळे, घणसोली तालुकाध्यक्ष हेमंत पाटील, सीबीडी बेलापूर तालुकाध्यक्ष अरुण कांबळे, रबाळेचे तालुकाध्यक्ष महेश बिराजदार, तुर्भेचे तालुकाध्यक्ष नियाज शेख यांचा समावेश आहे.

WhatsApp युजर्सना मोठा धक्का; ‘या’ स्मार्टफोन्समध्ये व्हॉट्सअ‍ॅप वापरता येणार नाही

या सर्वांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिंदे गटात प्रवेश केला आहे. राष्ट्रवादीतील अंतर्गत वादामुळे पक्ष कोलमडून पडल्याचे बोलले जात आहे. अशोक गावडे यांची पक्ष सोडण्याची चर्चा झाल्याने गेल्या आठवड्यातच त्यांना जिल्हाध्यक्षपदावरून हटवण्यात आले. आता अखेर त्यांनी एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिंदे गटात प्रवेश करत राष्ट्रवादीला मोठा धक्का दिला आहे.

असेच सुपरफास्ट अपडेट मिळवण्याकरिता या लिंकवर क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.