Take a fresh look at your lifestyle.

चहूबाजूंनी अडचणीत आलेल्या डिसले गुरुजींसाठी फडणवीस सरसावले, काय म्हणाले पहा

0

ओटीटी न्यूज नेटवर्क

मुंबई – आंतरराष्ट्रीय पुरस्कार विजेते शिक्षक रणजितसिंह डिसले गुरुजीं सध्या सर्वच बाजुंनी अडचणीत सापडले आहेत. अशातच, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दिसले गुरुजींच्या मदतीला धावून आले आहेत. एका प्रतिष्ठित आंतरराष्ट्रीय पुरस्कारने गौरविलेल्या शिक्षकावर अन्याय होईल, असा कोणताच निर्णय घेणार नाही, असं देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केलं आहे. डिसले गुरुजींचं म्हणणं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि मी ऐकून घेतलं असून त्यांच्यावर अन्याय होईल असं पाऊल उचलणार नाही, असं फडणवीसांनी सांगितलं.

प्रताप सरनाईकांनी फोडले 10 नगरसेवक; शिंदे गटाच्या दाव्यावरून शिवसेना आक्रमक

आंतरराष्ट्रीय पुरस्कार प्राप्त शिक्षक रणजितसिंह डिसले राजीनाम्यामुळे पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. विभागीय चौकशीत त्यांच्यावर झालेल्या आरोपानंतर त्यांनी राजीनामा देण्याचा निर्णय घेतला. जवळपास चौतीस महिने कामावर हजर न राहता त्यांनी शासनाकडून पगार घेतला आहे. हा सर्व पगार सोलापूर जिल्हा प्रशासन वसूल करणार आहे. त्यांच्यावरील कारवाई अटळ असताना आज त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली आहे. आपली बाजू त्यांनी मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांसमोर मांडली. त्यानंतर डिसले गुरुजींवर अन्याय होईल असं पाऊल उचलणार नाही, असं फडणवीस म्हणाले.

डिसले गुरुजी आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि मला भेटले आहेत. सीएम साहेबांनी गुरुजींचं म्हणणं ऐकून घेतलं आहे. डिसले गुरुजींची बाजू ऐकून घेतल्यानंतर आवश्यक ते निर्देश दिले आहेत. दरम्यान त्यांच्यावर अन्याय होईल, असं पाऊल राज्य शासन उचलणार नाही, अशी शाश्वती फडणवीसांनी डिसले गुरुजींना दिली.

असेच सुपरफास्ट अपडेट मिळवण्याकरिता या लिंकवर क्लिक करा

‘योग्य’ आदेश दिले

ज्या शिक्षकाला आंतरराष्ट्रीय पुरस्कार मिळालाय, ज्याने भारताची ख्याती सर्वदूर पसरवलीये, त्यांच्याबाबतीत चुकीचं काम होऊ नये, त्यांना त्रास होऊ नये, यादृष्टीने योग्य आदेश मुख्यमंत्र्यांनी दिलेले आहेत, असं फडणवीसांनी माध्यमांशी बोलताना सांगितलं.

Leave A Reply

Your email address will not be published.