Take a fresh look at your lifestyle.

आता मिळणार LIC पॉलिसीवरही कर्ज; काय आहेत नियम अन् कसा करावा अर्ज?

0
maher

ओटीटी न्यूज नेटवर्क

मुंबई : अचानक पैशाची गरज भासल्यास, बरेच लोक स्वतःची पॉलिसी मोडतात आणि पैसे काढतात किंवा पर्सनल लोनसाठी अर्ज करतात. पण तुमच्याकडे एलआयसी पॉलिसी असल्यास टेन्शन घेण्याची गरज नाही, कारण तुम्ही या पॉलिसीवर कर्जदेखील घेऊ शकता. विमा पॉलिसीवर घेतलेल्या कर्जाचा व्याजदर हा पर्सनल लोनपेक्षा कमी असतो. अशा स्थितीत तुमचे व्याज कमी होईल आणि तुम्हाला तुमची पॉलिसी सरेंडर करण्याची गरजही पडणार नाही.

विमा पॉलिसी कर्ज केवळ ट्रेडिशनल आणि एंडोमेंट पॉलिसींसारख्या निवडक पॉलिसींवर उपलब्ध आहे. कर्जाची रक्कम समर्पण मूल्याच्या (Surrender value) आधारे निर्धारित केली जाते. तुम्हाला पॉलिसीच्या सरेंडर मूल्याच्या 80 ते 90 टक्केपर्यंत कर्ज मिळू शकते. कर्ज पॉलिसीचा व्याजदर पॉलिसीधारकाच्या प्रोफाइलवर अवलंबून असतो. सहसा ते 10 ते 12 टक्क्यांपर्यंत असते.

ऑगस्टमध्ये सेवाक्षेत्राची समाधानकारक कामगिरी; ‘जीडीपी’ला गती देण्यास हातभार लाभला

पॉलिसीवर कर्ज देताना, विमा कंपनी तुमची पॉलिसी गहाण ठेवते. कर्जाची परतफेड केली नसेल किंवा थकित कर्जाची रक्कम पॉलिसीच्या सरेंडर मूल्यापेक्षा जास्त असल्यास तुमची पॉलिसी रद्द करण्याचा अधिकार कंपनी राखून ठेवते. जर तुमची विमा पॉलिसी कर्जाची परतफेड होण्यापूर्वी परिपक्व (Mature) झाली असेल, तर विमा कंपनी तुमच्या रकमेतून कर्जाची रक्कम वजा करू शकते.

अर्ज कसा करावा?

  • तुम्ही पॉलिसी कर्जासाठी ऑनलाइन आणि ऑफलाइन अशा दोन्ही पद्धतीने अर्ज करू शकता.
  • ऑफलाइनसाठी तुम्हाला LIC कार्यालयात जाऊन KYC कागदपत्रांसह कर्जासाठी अर्ज करावा लागेल.
  • ऑनलाइन अर्ज करण्यासाठी, LIC ई-सेवांसाठी नोंदणी करा.
  • त्यानंतर तुमच्या खात्यात लॉग इन करा. यानंतर तुम्ही इन्शुरन्स पॉलिसी रिप्लेसमेंट लोन मिळवण्यास पात्र आहात की नाही ते तपासा.
  • होय असल्यास, कर्जाच्या अटी, शर्ती, व्याजदर इत्यादी काळजीपूर्वक वाचा.
  • त्यानंतर अर्ज सबमिट करा आणि KYC कागदपत्रे ऑनलाइन अपलोड करा.

असेच सुपरफास्ट अपडेट मिळवण्याकरिता या लिंकवर क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.