Take a fresh look at your lifestyle.

एक नव्हे तर चार प्रकारचे आधारकार्ड उपलब्ध; वाचा काय आहे फीचर्स आणि फायदे

0
maher

ओटीटी न्यूज नेटवर्क

मुंबई : भारतीय नागरिकांसाठी आधार कार्ड हा महत्त्वाचा पुरावा आहे. सरकारी असो वा खाजगी सर्व कामात हा दस्तऐवज अतिआवश्यक असतो. आधार कार्डवर कार्डधारकाची सर्व आवश्यक माहिती उदाहरणार्थ; नाव, फोटो, जन्मतारीख, पत्ता इत्यादी आधार कार्डावर नोंदवले जाते. आधार कार्ड UIDAI द्वारे जारी केले आहेत. या दस्तऐवजाचे महत्त्व लक्षात घेऊन UIDAI ने आधारचे विविध प्रकारचे फॉर्म जारी केले आहेत. हे सर्व फॉरमॅटमध्ये तितकेच वैध आहे.

ई-आधार : ई आधार ही इलेक्ट्रॉनिक आवृत्ती (version) आहे, ज्यामध्ये पासवर्ड सुरक्षा आहे. यात ऑफलाइन पडताळणीसाठी सुरक्षित QR कोडसुद्धा आहे. नोंदणीकृत मोबाइल क्रमांकाद्वारे UIDAI च्या अधिकृत वेबसाइटला भेट देऊन ई-आधार (E-Aadhaar) तयार केला जाऊ शकतो. डाउनलोड करण्यासाठी कोणतेही शुल्क नाही.

संजय राऊतांचे 19 पर्यंत मुक्काम पोस्ट आर्थर रोड

आधार लेटर : हे कागदावर आधारित लॅमिनेटेड पत्र (Laminated letter) आहे. पत्रामध्ये कार्ड जारी करण्याची तारीख आणि प्रिंट तारखेसह सुरक्षित QR कोड आहे. जर तुम्हाला नवीन आधार तयार करायचा असेल किंवा त्यात बायोमेट्रिक अपडेट करायचे असेल तर हे आधार पत्र विनामूल्य आहे. मूळ प्रत हरवल्यास किंवा खराब झाल्यास, आधार पत्र UIDAI च्या अधिकृत वेबसाइटवरून ऑनलाइन बदलले जाऊ शकते. यासाठी 50 रुपये आकारले जातात.

एम आधार : UIDAI ने विकसित केलेले अधिकृत मोबाईल ऍप्लिकेशन (mAadhaar Mobile App) आहे. हे आधार धारकांना त्यांचे आधार रेकॉर्ड सीआयडीआरकडे (CIDR) नोंदणीकृत ठेवण्यासाठी एक इंटरफेस प्रदान करते. mAadhaar प्रोफाइलला विमानतळ आणि रेल्वेने वैध आयडी पुरावा म्हणून मान्यता दिली आहे.

उद्धव ठाकरेंना ‘त्या’ कामाची शिक्षा भोगावी लागणार; नवनीत राणांचा इशारा

आधार पीव्हीसी कार्ड : UIDAI द्वारे जारी केलेल्या आधार PVC कार्डची ही नवीनतम आवृत्ती (version) आहे. हलके आणि टिकाऊ असण्याव्यतिरिक्त, PVC आधारित आधार कार्डमध्ये डिजिटल QR कोड माहितीसह अनेक सुरक्षा वैशिष्ट्ये आहेत. तुम्ही uidai.gov.in किंवा Resident.uidai.gov.in वर भेट देऊन आधार क्रमांक, व्हर्च्युअल आयडी किंवा एनरोलमेंट आयडी द्वारे डाउनलोड करू शकता, ज्यासाठी 50 रुपये शुल्क आकारले जाईल.

असेच सुपरफास्ट अपडेट मिळवण्याकरिता या लिंकवर क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.