Take a fresh look at your lifestyle.

ओबीसी समाज अधिकार संमेलनात ठरणार ‘ही’ रणनीती; काँग्रेसचे दिग्गज उद्या विदर्भात!

0

ओटीटी न्यूज नेटवर्क

नागपूर : दि २६ शेगावात 28 मार्च रोजी होणाऱ्या ओबीसी समाज अधिकार संमेलनाची तयारी अंतिम टप्प्यात झालेले असून अकोला वाशीम बुलढाणा जिल्ह्यातील ओबीसी बांधवांनी आपल्या न्याय व हक्कासाठी संमेलनाच्या माध्यमाने संतनगरीत एकत्रित येण्याचे आवाहन खामगाव विधानसभा मतदार संघाचे काँग्रेस पक्षाचे नेते ज्ञानेश्वरदादा पाटील यांनी केले आहे. या संमेलनाच्या माध्यमातून काँग्रेस पुन्हा एकदा महाराष्ट्रात आपली संघटन शक्ती वाढवण्याच्या तयारीत असून त्यासाठी काँग्रेसची बडी नेते मंडळी काय रणनीती ठरवते याकडे लक्ष लागले आहे.

राज्यातील ओबीसी समाज बांधवांना राजकीय आरक्षणासह त्यांच्या न्याय व ज्वलंत प्रश्न सुटावे यासाठी ओबीसी संघर्ष समिती राष्ट्रीय ओबीसी महासंघ समता परिषद बारा बलुतेदार महासंघ आदींच्या माध्यमाने संतनगरी शेगावात 28 मार्च रोजी ओबीसी समाज अधिकार संमेलनाचे आयोजन करण्यात आलेले आहे. या संमेलनामध्ये छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश बघेल, काँग्रेस नेते हार्दिक पटेल, ओबीसीचे नेते तथा काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नानाभाऊ पटोले आपली भूमिका मांडणार आहेत

25 हजार ओबीसी येणार एकत्र

या संमेलनाला विदर्भातील ओबीसी समाजाचे नेते मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत 25 हजार ओबीसी बांधव या संमेलनाला उपस्थित राहतील असे सांगत समाज बांधवांनी आपल्या न्याय हक्क व मागण्यांसाठी या मेळाव्याला मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन ओबीसींचे नेते तथा खामगाव विधानसभा मतदार संघाचे काँग्रेस पक्षाचे नेते ज्ञानेश्वरदादा पाटील यांनी केले

यावेळी प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष संजय राठोड, प्रदेश सचिव धनंजय देशमुख, शेगावचे माजी नगराध्यक्ष शैलेंद्र पाटील, काँग्रेसचे शहराध्यक्ष किरणबापू देशमुख, डॉ.जयंतराव खेडकर आदींची उपस्थिती होती यावेळी प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष संजय राठोड यांनी कार्यक्रमाच्या आयोजनाबाबत सविस्तर माहिती दिली.

Leave A Reply

Your email address will not be published.