Take a fresh look at your lifestyle.

सोनिया गांधींविरोधात आक्षेपार्ह ट्वीट; अतुल भातखळकरांविरोधात गुन्हा दाखल

0

ओटीटी न्यूज नेटवर्क

मुंबई : शिवसेना आणि काँग्रेसवर टीका करण्याची एकही संधी न सोडणारे भाजप आमदार अतुल भातखळकर एका ट्विटमुळे अडचणीत सापडले आहेत. कॉंग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांच्याविरोधात आक्षेपार्ह वक्तव्य केल्याबद्दल त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

महात्मा गांधींनंतर भारतीयांचे मन समजून घेणारे दुसरे नेते पंतप्रधान मोदी; ‘या’ मंत्र्यांचं मोठं विधान

दरम्यान, नॅशनल हेराल्ड प्रकरणात सोनिया गांधी यांची ईडीकडून चौकशी सुरू होती. अशावेळी अतुल भातखळकर यांनी सोनिया गांधी यांच्याबद्दल ट्विट केले आहे. तपास सुरू असताना सोनिया गांधी कोरोना संसर्गामुळे गैरहजर होत्या. त्यावर अतुल भातखळकर यांनी ‘ईडी व्हेरियंटट’ असं ट्विट केलं होतं. त्यांच्या या ट्विटवर काँग्रेसनं तीव्र संताप व्यक्त केला.

या प्रकरणी काँग्रेस नेते संदीप उदमले यांनी पुण्यातील सायबर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. याप्रकरणी भातखलार यांच्यावर अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

असेच सुपरफास्ट अपडेट मिळवण्याकरिता या लिंकवर क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.