Take a fresh look at your lifestyle.

ऑन धिस टाईम मीडियातर्फे “विदर्भ आयडॉल ” पुरस्काराचे आयोजन; मराठी अभिनेते मकरंद अनासपुरे यांची प्रमुख उपस्थिती

ओटीटी न्यूज नेटवर्क

नागपूर – मीडिया क्षेत्रात अग्रेसर असणाऱ्या ‘ऑन धिस टाईम मीडिया प्रा.ली.’ तर्फे विदर्भ आयडॉल या पुरस्काराचे आयोजन करण्यात आले आहे. विदर्भातील १०० कर्तृत्ववान व्यक्तींना ज्येष्ठ मराठी अभिनेते मकरंद अनासपुरे पुरस्कार देऊन सन्मानित करणार असल्याची माहिती ऑन धिस टाईम मीडियाचे संपादक संदीप थोरात यांनी दिली.

नागपूर येथील वसंतराव देशपांडे सभागृहात १५ जून रोजी हा पुरस्कार सोहळा रंगणार आहे. कला,क्रीडा,शिक्षण,समाजकारण,राजकारण,अर्थकारण,उद्योजक, पत्रकारिता,वारकरी संप्रदाय या क्षेत्रातील १०० व्यक्तींना हा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येणार आहे.विदर्भात चांगल काम करणाऱ्या व्यक्तींच्या पाठीवर शाबासकीची थाप पडावी तसेच समाजात काम करत असताना त्यांचा उत्साह वाढावा,हा या पुरस्कारामागील हेतू आहे.

दरम्यान, पुरस्कारासाठी अकोला, वाशिम, बुलढाणा, यवतमाळ, वर्धा, अमरावती, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली या जिल्ह्यातील कर्तृत्ववान व्यक्तींनी पहिला मजला,व्हाईट हाऊस, उज्वल नगर, सोमलवाडा,वर्धा रोड,नागपूर येथे आपले प्रस्ताव पाठवावेत. असे आवाहन विदर्भ ब्यूरो चीफ आनंद आंबेकर यांनी केले आहे. यासंदर्भात अधिक माहितीसाठी ऑन धिस टाईमच्या इव्हेंट प्रमुख दिव्या भगत-पारधी (8999747216) यांच्याशी संपर्क करावा. या सोहळ्याला विदर्भातील प्रमुख राजकीय व्यक्ती देखील उपस्थित राहणार आहेत.

Comments are closed.