Take a fresh look at your lifestyle.

ऑनलाइन बँकिंग फ्रॉड : ऑनलाइन व्यवहार करणाऱ्यांनी ही बातमी अवश्य वाचा

0
maher

ओटीटी न्यूज नेटवर्क

मुंबई : जर तुमच्या हातात स्मार्टफोन असेल तर डिजिटल युगात प्रत्येक सुविधा सहज उपलब्ध आहे. घरी बसूनही तुमचे बँक खाते सहज ऑपरेट करू शकता. म्हणजेच बँकिंग सुविधांसाठी (Banking facilities) तुम्हाला बँकेच्या शाखेत जाण्याचा त्रासही सहन करावा लागत नाही. मात्र, सुविधांच्या या युगात तुमची बँक खात्याची सुरक्षितता आणि दक्षताही खूप महत्त्वाची आहे.

कारण गेल्या काही काळापासून ऑनलाइन बँकिंग (Online banking) फसवणुकीच्या घटनांमध्ये सातत्याने वाढ होत आहे. एका छोट्याशा चुकीमुळे बँक खात्यात ठणठणात व्हायला काही सेकंदात वेळ लागत नाही. स्मार्टफोनद्वारे किंवा डिजिटल पद्धतीने आर्थिक व्यवहार (Financial transactions) करणाऱ्यांनी बातमी जरूर वाचा.

हा परतीचा पाऊस नसून मान्सूनच; हवामान खात्याने दिली महत्त्वाची माहिती

स्मार्टफोनद्वारे किंवा डिजिटल पद्धतीने ऑनलाइन बँकिंग (Online banking) वापरणाऱ्यांनी पासवर्डच्या बाबतीत निष्काळजी होऊ नये . बँकिंग खात्यांचे पासवर्ड सोपे ठेवू नये. पासवर्ड तुमच्या वाढदिवसाचा किंवा कोणत्याही सोप्या अंकाचा असेल तर पासवर्ड जाणून घेण्यासाठी सायबर घोटाळेबाजांना फारशी मेहनत करावी लागत नाही.

थोडयाश्या लोभामुळे खात्री असल्याशिवाय कुठल्याही लिंक्सवर क्लिक करू नका. सायबर ठग (cyber thugs) ग्राहकांची अनेक प्रकारे फसवणूक करण्याच्या निरनिराळ्या योजना आखतात. अनेकवेळा सायबर ठग तुमच्यावर नजर ठेवून असतात आणि लालच देऊन फसवणुकीचा सापळा लावतात. सोशल मीडिया अकाउंट वापरत असतांना अनोळखी लोकांवर विश्वास ठेवू नये.

शेअर बाजारात मोठी उसळण; सेन्सेक्सने गाठला ‘इतक्या’ हजारांचा टप्पा

अनेक वेळा चॅटिंग अ‍ॅप (Chatting app) व्हॉट्सअ‍ॅपवर अनोळखी नंबरच्या लिंक्सही येतात. या लिंक्स उघडण्यासाठी तुम्हाला बक्षीस जिंकण्याचं लालच दिलं जातं. चुकूनही अशा लिंक उघडू नका. ताबडतोब खाते ब्लॉक करा आणि नंबर हटवा.

प्रत्येक अ‍ॅपला अपडेटची आवश्यकता असते आणि प्रत्येक अपडेट अधिक चांगली वैशिष्ट्ये आणि फायदे आणते. तुम्ही नेहमी UPI पेमेंट अ‍ॅप अपडेट केले पाहिजे. तुमच्या फोनवर अनेक पेमेंट अ‍ॅप्स वापरणे टाळा आणि केवळ Playstore किंवा App Store वरून विश्वसनीय आणि खातरजमा केलेले पेमेंट अ‍ॅप्स डाउनलोड करा.

असेच सुपरफास्ट अपडेट मिळवण्याकरिता या लिंकवर क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.