Take a fresh look at your lifestyle.

वेदांत-फॉक्सकॉन प्रकरणामुळे विरोधक आक्रमक; सरकारची कोंडी करण्याचा प्रयत्न

0

ओटीटी न्यूज नेटवर्क

मुंबई : महत्वाकांक्षी सेमीकंडक्टर चिप प्रकल्प वेदांत -फॉक्सकॉन अखेरच्या टप्प्यात गुजरातमध्ये नेण्याच्या निर्णयामुळे राजकीय वातावरण तापले आहे, सध्या विरोधक या मुद्द्याला धरून समाजातील युवा वर्गाला सरकारविरोधी भूमिका घेण्यास खतपाणी घालत आहे. नेमके या मुद्द्याला धरून राज्य व केंद्र सरकाराला सर्वस्वी जबाबदार ठरवत महाविकास आघाडीचे नेते राज्यभर आंदोलन करत आहे. यादरम्यान वेदांतचे प्रमुख अनिल अग्रवाल यांनी गौप्यस्फोट करत हा प्रकल्प आधीच गुजरातला हलविण्याचे ठरले होते असे विधान केले आहे. आता विरोधक वेदांतच्या प्रमुखांवर देखील आरोप करताना दिसत आहे.

जागतिक श्रीमंतांच्या यादीतील आठ अब्जाधिशांना ४१ अब्जाचा फटका; ‘या’ भारतीय उद्योगपतींची चांदी

नेमका हाच मुद्दा धरून राष्ट्रवादीने विविध भागात आंदोलन केले, या वेळी राज्यसरकारवर निष्काळजीपणाचा आरोप देखील करण्यात येत आहे. जर वेदांत फॉक्सकॉन प्रकल्प गुजरातला प्रस्तावित करायचा होता तर १५ जुलै महाराष्ट्राचे उच्च सचिव यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय बैठक का घेण्यात आली होती, असा प्रश्न काँग्रेसचे प्रदेश समितीचे मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे यांनी केला आहे. एकनाथ शिंदे व देवेंद्र फडणवीस या दोन नेत्यांमध्ये अंतर्गत वाद असल्याने हा प्रकल्प गुजरातेत गेल्याचे भाष्य लोंढे यांनी केले.

हवामान बदलामुळे वातावरणात दाहकता वाढणार; येत्या काळात जगभरात उष्णतेचा प्रकोप

भविष्यातील मोठ्या प्रकल्पाच्या आशा दाखवत महाराष्ट्रातून वेदांत फॉक्सकॉन प्रकल्प पळविल्याचा आरोप काँग्रेस नेते अशोक चव्हाण यांनी केला. एकंदरीतच या प्रकल्पाच्या मुद्द्याला धरून या-ना त्या मार्गाने सरकारची कोंडी करण्याचा प्रयत्न करत आहे. राजकीय पातळीवर आरोप -प्रत्यारोप चालत असताना समाजातील युवा वर्गाला आक्रमक भूमिकेकडे वाळविणे कितपत योग्य आहे याचा विचार विरोधी पक्षाच्या नेत्यांनी करणे गरजेचे आहे.

असेच सुपरफास्ट अपडेट मिळवण्याकरिता या लिंकवर क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.