Take a fresh look at your lifestyle.

Big Breaking शरद पवार नाही तर महाराष्ट्रातील ‘या’ दिग्गज नेत्याला राष्ट्रपती निवडणुकीसाठी उमेदवारी?

0
maher

ओटीटी न्यूज नेटवर्क

पुणे – महाराष्ट्रात सध्या राजकीय वर्तुळात अनेक घडामोडी घडतांना दिसून येत आहेत. विशेष म्हणजे सध्या विधान परिषदेच्या निवडणुकीच्या (MLC Election) पार्श्वभूमीवर दिल्लीत राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी (President Election) विविध घडामोडी घडत आहेत. येत्या 18 जुलैला राष्ट्रपतीपदासाठी निवडणूक होणार आहे. या निवडणुकीत भाजपला (BJP) घेरण्यासाठी विरोधकांनी मोर्चेबांधणी करायला सुरुवात केली आहे. भाजपच्या विरोधातील जवळपास सर्वच पक्ष या निवडणुकीत एकत्र आले आहेत.

‘या’ स्टार खेळाडूला टीम इंडियामधून कायमसाठी बाहेरचा रस्ता

खरं तर विरोधकांनी सर्वानुमते राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांचं नाव सुचवलं होतं. पण शरद पवारांनी तो प्रस्ताव प्रांजळपणे नाकारला. त्यानंतर विरोधकांकडून आता महाराष्ट्रातील (Maharashtra) आणखी एका दिग्गज नेत्याला राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी उमेदवारी देण्याबाबतची चर्चा सुरु आहे. विरोधकांकडून काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि देशाचे माजी गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे (Sushilkumar Shinde) यांना उमेदवारी दिली जाऊ शकते. त्यासाठी राजकीय हालचाली देखील तशा घडताना दिसत आहेत.

Samsung चे लाख रुपयांचे महागडे स्मार्टफोन खरेदी करा; फक्त ३०४२ रुपयांत मिळेल घरपोच सेवा

हाती आलेल्या माहितीनुसार, काँग्रेसच्या बैठकीसाठी सुशीलकुमार शिंदे यांना तातडीचे निमंत्रण आले आहे. अखिल भारतीय काँग्रेस समितीने सुशीलकुमार यांना तातडीने दिल्लीला बोलावून घेतलं आहे. त्यानुसार सुशीलकुमार शिंदे आज दिल्लीकडे रवाना झाले आहेत. त्यामुळे सुशीलकुमार यांचे रविवारचे सगळे कार्यक्रम रद्द करण्यात आले आहेत.

असेच सुपरफास्ट अपडेट मिळवण्यासाठी खालील लिंकला क्लिक करा

विरोधी पक्षांकडून राष्ट्रपतीपदाच्या उमेदवारीसाठी सुशीलकुमार शिंदे यांच्या नावाची जोरदार चर्चा आहे. सुशीलकुमार यांचा राजकीय अनुभव दांडगा आहे. त्यांनी महाराष्ट्राचं मुख्यमंत्रीपदही भुषवलं आहे. याशिवाय त्यांनी देशाचं केंद्रीय गृहमंत्रीपदाची देखील धुरा सांभाळली आहे. त्यांचा राजकीय अनुभव पाहता विरोधकांकडून सुशीलकुमार यांना उमेदवारी देण्याबाबत चर्चा आहे.

Cibil Score: इतरांप्रमाणे तुम्हालाही चांगला क्रेडिट स्कोअर हवाय का? या महत्वाच्या गोष्टी आताच जाणून घ्या

Leave A Reply

Your email address will not be published.