Take a fresh look at your lifestyle.

‘या’ दोन जागांपैकी दसरा मेळावा कुठे होणार? मुख्यमंत्री शिंदेंनी बोलावली बैठक

0
maher

ओटीटी न्यूज नेटवर्क

मुंबई : शिवसेनेतील बंडखोरीमुळे दोन गट पडले आहेत. त्यामुळे आता दसरा मेळावा घेण्यावरून शिवसेना आणि शिंदे गटात खडाजंगी झाली आहे. शिवतीर्थावर शिंदे गटाची तयारी सुरू आहे, जागा मिळाली तर बीकेसी मैदानावर करू, अशी माहिती शिंदे गटाचे प्रतोद भरत गोगावले यांनी दिली आहे. शिवतीर्थावर दसरा मेळावा घेण्यासाठी शिवसेना आक्रमक झाली आहे. शिंदे गटाकडूनही जोरदार तयारी सुरू आहे. शिंदे गटाचे प्रतोद भरत गोगावले यांनी मात्र दसरा मेळाव्याबाबत मोठे वक्तव्य केले आहे.

महाराष्ट्राच्या राजकारणाला मिळणार नवं वळण; ‘या’ नेत्याचे युतीबाबत सुचक विधान

“आम्ही दसरा मेळाव्याची जय्यत तयारी सुरू केली आहे. शिवाजी पार्क किंवा बिकेसी मैदानावर करू, या संदर्भात उद्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बैठक बोलावली आहे. या बैठकीत ठरेल की दसरा मेळावा कुठे घ्यायचं ते. पण पहिले प्राधान्य शिवाजी पार्कला असेल, असे गोगावले म्हणाले, ‘जिथे जागा मिळेल तिथे मेळावा करू, बाळासाहेबांचे विचार दाखवून देऊ, कोणाला निमंत्रित करायचे ते उद्याच्या बैठकीत ठरवले जाईल, असेही गोगावले यांनी स्पष्ट केले.

शिंदे-फडणवीस सरकारच्या मंत्रिमंडळ बैठकीतील मोठे निर्णय; वाचा सविस्तर…

‘मी गोळीबार केला नाही, असे आमदार सदा सरवणकर यांनी काल सांगितले. अशी घटना घडू नये म्हणून सदा सरवणकर यांनी खंत व्यक्त केली आहे. एफआयआर दाखल केल्याचे त्यात स्पष्ट होईल. मनसेसोबत युती करायची की नाही याचा निर्णय मुख्यमंत्री घेतील. अनेक आरोप करत आहेत. मात्र मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे खूप काम करत आहेत. यातील वस्तुस्थिती मला माहीत नाही, त्यामुळे मी यावर काही बोलणार नाही, बैठक होऊ द्या मग बघू, असेही गोगावले म्हणाले.

दरम्यान, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत बुधवारी मुंबईत शिंदे गटाचे सर्व आमदार, खासदार आणि पदाधिकाऱ्यांची महत्त्वपूर्ण बैठक होणार आहे. या बैठकीत दसरा मेळाव्या संदर्भात प्राथमिक तयारीचा आढावा घेतला जाणार आहे.

असेच सुपरफास्ट अपडेट मिळवण्याकरिता या लिंकवर क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.