Take a fresh look at your lifestyle.

कर्जतला ऑक्सिजन पार्कची निर्मिती

0
maher

गणेश जेवरे, ओटीटी न्यूज नेटवर्क

कर्जत : रोटरी क्लब ऑफ कर्जत सिटी आणि नगरपंचायत कर्जत यांच्या संयुक्त विद्यमाने आज कर्जत येथे नागरिकांसाठी ऑक्सिजन पार्क तयार करण्यात आले आहे. अशा पद्धतीने तालुक्यातला आगळा वेगळा उपक्रम रोटरी क्लब च्या माध्यमातून राबविण्यात आला आहे.

या वेळी प्रांताधिकारी अजित थोरबोले, गटविकास अधिकारी अमोल जाधव, मुख्याधिकारी गोविंद जाधव, नगराध्यक्षा उषा राऊत, रोटरी क्लबचे अध्यक्ष रामदास काळदाते, डॉ. संदीप काळदाते, माजी नगराध्यक्ष नामदेव राऊत, माजी नगराध्यक्षा प्रतिभा नंदकिशोर भैलुमे, गटनेते संतोष मेहत्रे, उपगट नेते सतीश पाटील, बांधकाम सभापती छाया शेलार, महिला बालकल्याण सभापती ज्योती शेळके, नगरसेविका मोनाली तोटे, नगरसेवक भास्कर भैलुमे, रज्जाक झारेकरी, भाऊसाहेब तोरडमल, कॅप्टन संजय चौधरी, सुनील शेलार,प्रसाद ढोकरीकर, देवा खरात, रोटरीचे सचिव राजेंद्र जगताप, रोटरी क्लबचे उपाध्यक्ष गणेश जेवरे, रोटरी क्लब चे सदस्य अनिल तोरडमल, नितीन देशमुख , विशल मेहेत्रे, अतुल कुलथे, संदीप गदादे, काकासाहेब काकडे ,मुन्ना पठाण, घनश्याम नाळे, ओंकार तोटे ,डॉक्टर अद्वैत काकडे, प्राचार्य चंद्रकांत राऊत, सचिन धांडे, राजेंद्र सुपेकर, राहुल खराडे, रवींद्र राऊत, डॉक्टर कार्तिक काळदाते, राजेंद्र पठाडे उपमन्यु शिंदे व नामदेव गायकवाड आदी उपस्थित होते.

कर्जत नगरपंचायतने माझी वसुंधरा अभियान २ या स्पर्धेत सहभाग नोंदवला आहे. या पार्श्वभूमीवर रोटरी क्लब ऑफ कर्जत सिटी यांनी मियावाकी ऑक्सीजन पार्क हा उपक्रम या ठिकाणी राबवला.

यावेळी बोलताना प्रांताधिकारी थोरबोले म्हणाले की, रोटरी क्लब ऑफ कर्ज सिटी ही सातत्याने सामाजिक उपक्रम राबवत आहे. आज देखील त्यांनी नागरिकांना ऑक्सिजन जास्तीत जास्त मिळावा यासाठी नगरपंचायतच्या मदतीने या ठिकाणी मियावाकी ऑक्सिजन पार्क तयार केला आहे. यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये वेगवेगळे वृक्ष लावले आहेत आणि खऱ्या अर्थाने याचा उपयोग कर्जतमधील नागरिकांना होणार आहे.

नगराध्यक्ष उषा राऊत म्हणाल्या की, माझी वसुंधरा अभियान या स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक मिळवण्यासाठी कर्जत शहरातील सर्व नागरिक नगरसेवक सर्व सामाजिक संघटना रोटरी क्लब नगरपंचायत चे कर्मचारी हे परिश्रम घेत आहेत. कोपरी कंपनी यापूर्वीदेखील गणेश विसर्जन प्रसंगी कृत्रिम तलाव तयार करून गणपती विसर्जनाची सुविधा उपलब्ध करून दिली होती. आजही त्यांनी ऑक्सिजन पार्क याठिकाणी निर्माण केला आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.