Take a fresh look at your lifestyle.

‘या’ दिवशी भारतात सुरू होणार ट्विटर ब्लू टिकसाठी पेड सर्व्हिस; एलॉन मस्क यांची स्पष्टोक्ती

0

ओटीटी न्यूज नेटवर्क

Twitter Blue Tick Paid in India : ट्विटरची मालकी टेस्लाचे मालक एलॉन मस्क यांच्याकडे आल्यावर त्यांनी ट्विटरवरील ब्लू टिकसाठी शुल्क आकारण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे आता युजर्सना ट्विटरवर व्हेरिफाईड अकाऊंटवर येणाऱ्या ब्लू टिकसाठी पैसे द्यावे लागतील. यासाठी दरमहा आठ डॉलर्स आकारण्यात येणार असल्याची माहिती मस्क यांनी स्वतः दिली आहे. त्यामुळे आता ट्विटरवर सबस्क्रिप्शन मॉडेल लागू होणार आहे. ट्विटरची सशुल्क सेवा लवकरच भारतातही सुरू होणार आहे. मस्क यांनी ब्लू टिकची सशुल्क सेवा भारतात कधी सुरू होईल हे स्पष्ट केले आहे.

राजकीय वर्तुळात पुन्हा युतीची चाहूल? भाजप करणार नवीन गेम!

भारतीय युजर्सचा मस्क यांना प्रश्न

एका भारतीय वापरकर्त्याने ट्विटरचे नवीन मालक एलॉन मस्क यांना विचारले की, ब्लू टिकची सशुल्क सेवा म्हणजे पेड सर्व्हिस भारतात कधी सुरू होईल. यावर उत्तर देताना मस्क यांनी स्पष्टीकरण दिले आहे. ‘ट्विटरची सशुल्क सेवा या महिन्याच्या अखेरीस भारतात सुरू होण्याची शक्यता आहे.’

भारतीयांसाठी 10 डॉलर शुल्क

एलॉन मस्क यांनी जाहीर केले की ट्विटर ब्लू टीकसाठी $8 आकारेल. हे शुल्क विविध देशांच्या चलनानुसार बदलणार असल्याचेही सांगण्यात आले. ब्लू टीकसाठी भारतीयांकडून दरमहा $8 आणि GST सह एकूण $10 आकारले जातील. 10 डॉलर म्हणजे 819 भारतीय रुपये. परंतु 10 डॉलरचे मूल्य यावर आधारित नसून क्रयशक्ती समता (Purchasing Power Parity) नुसार ठरणार आहे.

‘मशाल भडकली आणि भगवा फडकला’; उद्धव ठाकरेंनी केलं भाजपा-शिंदे गटाला लक्ष्य

काय आहे Purchasing Power Parity?

आंतरराष्ट्रीय नाणेनिधीनुसार (IMF) अनुसार, परचेजिंग पावर पॅरिटी असा दर आहे जो एका देशाचे चलन दुसऱ्या देशाच्या चलनात रूपांतरित करून समान प्रमाणात वस्तू आणि सेवा खरेदी करता येऊ शकतात. ओईसीडीनुसार (Organisation for Economic Co-operation and Development) परचेजिंग पॉवर पॅरिटी करेन्सी कन्‍वर्जनप्रमाणे दर ठरवला जातो. याद्वारे वेगवेगळ्या चलनांची खरेदी एकसमान केली जाते. या कन्‍वर्जनमध्ये वेगवेगळ्या देशांची किंमतीमधील फरकाला सामाविष्ट केले जात नाही.

अंधेरी जिंकल्यानंतर ऋतुजा लटकेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाल्या…

भारतीयांसाठी दरमहा 231 रुपये शुल्क

(Purchasing Power Parity नुसार 1 डॉलरचं मूल्‍य 81.98 रुपये होत नाही. परचेजिंग पॉवर पॅरिटीनुसार वेगवेगळ्या चलनांची खरेदी एकसमान केली जाते. या पद्धतीनं भारताच्या Purchasing Power Parity नुसार ट्विटरच्या ब्लू टिकसाठी 8 डॉलरचे 660 रुपये (8 Dollar – 185.11 INR PPP) होत नाही. ब्लू टिकसाठी 185 रुपये मोजावे लागत आहे. भारतीयांना यासाठी 10 डॉलर म्हणजे दरमहा 231 रुपये शुल्क ( 10 Dollar – 231.38 INR PPP ) भरावे लागेल.

असेच सुपरफास्ट अपडेट मिळवण्याकरिता या लिंकवर क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.