Take a fresh look at your lifestyle.

पंचायत समितीच्या कर्मचाऱ्यांचा सत्कार

0

सुनील रासने, ओटीटी न्यूज नेटवर्क

राहुरी : गेली दोन ते तीन वर्षापासून संपूर्ण जगावर जे कोरोनाचे संकट आले त्या संकटावर मात करण्यात पंचायत समितीच्या सर्व विभागाने चांगले काम केल्याने या कर्मचाऱ्यांचा गुण गौरव व्हावा अशी इच्छा पंचायत समितीच्या पदाधिकाऱ्यांची होती. अशा स्वरूपाचे कार्यक्रम भविष्यात होवो अशी इच्छा यावेळी माजी नगराध्यक्षा डॉ उषाताई तनपुरे यांनी व्यक्त केली.

कृषी विद्यापीठातील डॉ अण्णासाहेब शिंदे सभागृहात पंचायत समितीच्यावतीने 135 कर्मचाऱ्यांचा गुण गौरव समारंभ डॉ तनपुरे यांचे हस्ते पार पडला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सभापती बेबीताई सोडनर होत्या. यावेळी उपसभापती प्रदीप पवार, गट नेते रवींद्र आढाव, माजी सभापती मनीषा ओहळ, माजी सभापती व विद्यमान सदस्य सुनीता निमसे, बाळासाहेब लटके, जिल्हा परिषद सदस्य जनाबाई पैस, जिल्हा राष्ट्रवादीचे सरचिटणीस सुरेश निमसे, अण्णासाहेब सोडनर, गट विकास अधिकारी गोविंद खामकर, सहाय्यक गट विकास अधिकारी अनंत परदेशी आदि प्रमुख उपस्थित होते.

कोरोनाच्या महामारीमुळे शासन प्रत्येकाला घरीच थांबा असे एकीकडे सांगत असले तरी शिक्षक, आरोग्य कर्मचारी, अंगणवाडी सेविका, परिचारिका, डॉक्टर यांना मात्र जनतेमध्ये जाऊन त्यांची सेवा करावी लागत होती. या काळात आपली सेवा बजावत असताना अनेकांना आपले प्राण गमवावे लागले. तरीही त्याला न डगमगता आपण आपले काम चोखपणे बजावल्याने राहूरी पंचायत समितीच्या पदाधिकाऱ्यांनी एक कर्तव्य म्हणून कर्मचाऱ्यांचा प्रातिनिधिक स्वरूपात गुण गौरव करण्याची इच्छा राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांना बोलून दाखवली होती. त्यांच्या सूचनेनुसार हा कार्यक्रम होत असल्याचे डॉ तनपुरे यांनी सांगितले.

पंचायत समितीचे गट नेते व माजी सभापती रवींद्र आढाव यांनी आपल्या भाषणात पंचायत समितीचा जेव्हा पाच वर्षांपूर्वी कारभार हाती घेतला तेव्हा पंचायत समिती सदस्यांना कोणताही आर्थिक अधिकार नव्हता. त्यामुळे कामे करता येत नव्हती. त्यासाठी तत्कालीन राष्ट्रवादीचे विधानसभेतील गट नेते जयंत पाटील यांचे नेतृत्वाखाली राज्यातील सर्व पंचायत समिती सदस्य यांनी एकत्र येऊन मुंबई येथे आझाद मैदानावर आंदोलन केले. त्या आंदोलनामुळे राज्यातील पंचायत समिती सदस्यांना आर्थिक अधिकार व निधी प्राप्त होऊ लागला. माजी खासदार प्रसाद तनपुरे यांनी निवडून आलेल्या सदस्यांची बैठक घेऊन तालुक्यात जी विकास कामे करायची याबाबत मार्गदर्शन केले.

यावेळी राष्ट्रवादीचे जिल्हा सरचिटणीस सुरेश निमसे, रवींद्र अरगडे, सुनिल शेलार, सर्जेराव राऊत, सुरेखा शिंदे, उपसभापती प्रदीप पवार, सदस्य बाळासाहेब लटके, गणेश आठभाई यांनी मनोगत व्यक्त केले.

प्रास्ताविक गट विकास अधिकारी गोविंद खामकर यांनी केले. कार्यक्रमाला शिक्षणाधिकारी अर्जुन गारुडकर, उपभियंता संजय खिळे, विनायक मुळे, वसंत राऊत आदि उपस्थित होते. सूत्रसंचालन गणेश शिंदे यांनी केले. आभार उपसभापती प्रदीप पवार यांनी मानले.

Leave A Reply

Your email address will not be published.