Take a fresh look at your lifestyle.

‘या’ तारखेपूर्वी भरा आयकर, अन्यथा होईल दंड!

0
maher

ओटीटी न्यूज नेटवर्क

नवी दिल्ली : ज्या व्यक्तींचे वय आज रोजी ६० वर्षे पेक्षा कमी आहे व वार्षिक उत्पन्न (Annual Income) दोन लाख पन्नास हजार रुपये पेक्षा अधिक आहे त्या सर्वांना आयकर भरणे अनिवार्य असते. येथे मुख्यतः पगारदार (Job Employee) व्यक्तींना वार्षिक अडीच लाख पेक्षा जास्त उत्पन्न असल्यास आयकर (Income Tax) भरण्याचा आयकर कायदा आहे. अन्यथा अशा व्यक्तींना दंड बसू शकतो.

महागाईच्या काळात शिंदे सरकार देणार सर्वसामान्यांना विजेचा झटका, दरवाढीला मंजुरी

जे व्यक्ती आई.टी.आर स्लॅबमध्ये येत नाही त्यांना सुद्धा आयटीआर फाईल करणे गरजेचे असते. आयकर विभागातर्फे(Income Tax Department) नुकतेच वर्ष २०२१-२२ करिता आयकर भरण्याची तारीख घोषित केली आहे. यानुसार वित्तीय वर्ष २०२१-२२ ची आयकर भरण्याची अंतिम तारीख ३१ जुलै २०२२ आहे. ३१ जुलैनंतर आयकर भरल्यास पाच हजार रुपये इतका दंड वसूल करण्यात येईल. जर आपल्याला ऑनलाईन आयकर भरायचा असल्यास आयकर विभागाच्या अधिकृत संकेतस्थळावर (Income Tax Official Website) जाऊन सुद्धा भरता येईल.

‘शरद पवारांनी स्वप्न पाहू नये’, शिंदे गटाकडून पवारांना चोख उत्तर

काही सोप्या स्टेप्सद्वारे जाणून घेऊया ऑनलाईन कसा आयटीआर दाखल करता येईल

१. सर्वात प्रथम आयकर विभागाच्या अधिकृत संकेतस्थळावर म्हणजेच incometax.gov.in वर जा

२. पुढे ई-फाईल पर्यायांमधून आयकर रिटर्न पर्याय निवडा

३. सूचीमधून आयकर रिटर्न फाईल करा हा पर्याय निवडा

४. वित्तीय आर्थिक वर्ष २०२१-२२ हा पर्याय निवडा

५. फाइलिंग मोडकरिता ऑनलाईन हा निवडा

६. पुढे अर्ज स्थितीबाबत आपले स्टेट्स वैयक्तिक म्हणून निवडा व आयटीआर १ हा पर्याय निवडा

७. आयटीआर भरण्याबाबतचे कारण निवडा व पुढे जा

८. पुढे टॅब ५ वर जाऊन तेथील संपूर्ण माहिती वाचा

९. रिटर्न समरीवर जा

१०. पुढे घोषणा टॅबवर जाउन तिथे विनंती केलेली माहिती भरा

११. संपूर्ण माहिती शेवटी वाचून प्रमाणित करा काही चूक असल्यास योग्य माहिती संपादित करा

१२. शेवटी माहिती प्रमाणित करून सत्यापित करा , नेट बँकिंगद्वारे तुम्ही येथे पैसे भरू शकता.

असेच सुपरफास्ट अपडेट मिळविण्याकरिता या लिंकवर क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.