Take a fresh look at your lifestyle.

पेन ड्राईव्हचा बुमरँग फडणवीसांवरच; दाऊदशी संबंध असलेल्या व्यक्तींची नियुक्ती त्यांच्याच काळात

0

ओटीटी न्यूज नेटवर्क

मुंबई : विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी विधिमंडळात दुसरा पेन ड्राईव्ह बाँब टाकला; परंतु तो महाविकास आघाडीवर फुटण्याऐवजी फडणवीस यांच्यावरच तो बुमरँगसारखा उलटला. अल्पसंख्याक मंत्री नबाब मलिक यांनी दाऊदशी संबंधित असलेल्याची नियुक्ती वक्फ बोर्डावर केल्याचा आरोप केला खरा; परंतु ही नियुक्ती फडणवीस यांचे सरकार असतानाच झाल्याचे मलिक यांच्या कन्येने फडणवीस यांच्यासोबत संबंधिताचा फोटो टाकून निदर्शनास आणले.

मुदसैर लांबेंची नियुक्ती वादात

दाऊदशी संबंध असलेल्या माणसांची नियुक्ती मलिक यांनी वक्फ बोर्डावर केली आहे. ज्या डॉ मुदसैर लांबेंची नियुक्ती करण्यात आली, त्यांचे दाऊदशी संबध आहेत,असा आरोप करत याबाबतच्या पुराव्याचा पेनड्राइव्ह फडणवीस यांनी विधानसभेत सादर करत खळबळ उडवून दिली; मात्र फडणवीसांनी केलेला हा दावा खोटा असल्याचे मलिकांची कन्या सना मलिक शेख यांनी सांगत ज्या डॉ. लांबेंवर फडणवीस आरोप करत आहेत, त्यांची नियुक्ती माझ्या वडिलांनी नाही, तर फडणवीसांनीच केल्याचा दावा सना यांनी आपल्या ट्विटरच्या माध्यमातून केला आहे.

मलिकांना खाते मिळण्याच्या चार महिने अगोदर

सना शेख आपल्या ट्वीटमध्ये डॉ. लांबे आणि फडणवीसांचा फोटो शेअर करत म्हणाल्या, की फडणवीसांनी सांगितलेली माहिती पूर्ण खोटी आहे. डॉ. लांबेंची नियुक्ती ही 13 सप्टेंबर 2019 रोजी फडणवीस सरकारने वक्फ बोर्ड सदस्य म्हणून नियुक्ती केली होती. महाविकास आघाडी सरकारची स्थापना नोव्हेंबर 2019 मध्ये झाली. माझ्या वडिलांना जानेवारी 2020 च्या पहिल्या आठवड्यात अल्पसंख्याक/वक्फ विभाग मिळाला, असे सना यांनी आपल्या ट्वीटमध्ये म्हटले आहे.

दाऊदशी संबंध असल्याचे लांबे यांच्याकडून जाहीर

फडणवीसांनी सादर केलेल्या पेनड्राईव्हमधील संवादात वक्फ बोर्डावर नियुक्त सदस्य डॉ. लांबें हे अर्शद खान यांच्याशी बोलत आहेत आणि त्यांचे दाऊदशी संबध असल्याचे सांगत आहेत. याबाबतचा पुरावा म्हणून त्यांनी या संवादाचा एक पेनड्राईव्हच विधानसभा अध्यक्षांकडे सुपूर्द केला व तो संवाद सभागृहात वाचूनही दाखवला आहे.

लांबेवर बलात्काराचा आरोप

फडणवीस म्हणाले, की या पेनड्राईव्हमधील संभाषणात दोन पात्र आहेत. त्यापैकी एक मोहम्मद अर्शद खान आणि दुसरे म्हणजे ज्यांना डॉ. लांबे त्यांच्यावर एका मुलीने बलात्काराचा आरोप केला होता. लग्नाच्या आश्वासनामुळे ऑक्टोबर 2020 पर्यंत ही महिला पोलीस तक्रारीची वाट पाहत राहिली. मात्र, हा प्रकार समजल्यानंतर या महिलेच्या पतीने तिला घटस्फोट दिला. त्यामुळे या महिलेने लांबेला आत्महत्येचा इशाराही दिला. या महिलेच्या पतीविरोधात लांबेंनी चोरीची तक्रार दिली आहे. त्यानंतर या महिलेचा पती तुरुंगात गेला; मात्र लांबे मोकाट आहे, असा आरोप फडणवीस यांनी केला.

Leave A Reply

Your email address will not be published.