Take a fresh look at your lifestyle.

कच्च्या तेलात मोठी घसरण; पेट्रोलियम कंपन्यांचा पेट्रोल-डिझेलच्या दरांबाबत मोठा निर्णय

0
maher

ओटीटी न्यूज नेटवर्क

मुंबई – गेल्या काही दिवसांपासून रशिया युक्रेन या दोन राष्ट्रांमध्ये युद्ध सुरु आहे. या युद्धाचा परिणाम जागांसह भारतावरही काही प्रमाणात होत आहे. विशेषतः इंधनाचे वाढते भाव तसेच वाढत चाललेली महागाई यांमुळे नागरिकांमध्ये नाराजीचा सूर पाहायला मिळत आहे. दरम्यान, भारतात एकूण इंधन मागणीच्या तब्बल ८० ते ८५ टक्के इंधनाची आयात केली जाते. त्यामुळे जागतिक बाजारातील कच्च्या तेलाचे भाव आणि चलन विनिमय या घटकांचा परिणाम पेट्रोल आणि डिझेल दरांवर होतो. सार्वजनिक तेल वितरक कंपन्या दररोज सकाळी सहा वाजता पेट्रोल आणि डिझेलचा किरकोळ दर निश्चित करत असतात.

आज सलग १३०व्या दिवशीसुद्धा पेट्रोलियम कंपन्यांनी प्रमुख महानगरांमध्ये पेट्रोल तसेच डिझेलचे दर तेवढेच ठेवले आहेत. गेल्या आठवड्यात कच्च्या तेलाच्या किंमतीत मोठी घसरण झाल्याचं पाहायला मिळालं. या आठवड्यात देखील हे दर आणखी कमी होण्याची शक्यता आहे. परिणामी पेट्रोलियम कंपन्यांनी इंधन दर जैसे थे ठेवण्याचा निर्णय घेला आहे.

गेल्या सोमवारी कच्च्या तेलाचा भाव १३९.१३ डाॅलरपर्यंत वाढला होता. अक्षरशः २००८ नंतर आतापर्यंतची ही तेल किंमतीतील सर्वोच्च पातळी होती. आज सोमवार दिनांक १४ मार्च रोजी कमॉडिटी बाजारात ब्रेंट क्रूडचा भाव ३.६ टक्क्यांनी कमी झाला असून तो प्रती बॅरल १०८.५५ डॉलर इतका झाला आहे. यूएस डब्ल्यूटीआय क्रूडचा भाव १०५.४० डाॅलर इतका झाला असून त्यात ३.९३ टक्के इतकी घसरण झाली.

कच्च्या तेलाचे वाढलेले भाव सध्या वाढलेले आहेत. मात्र, येत्या काळात तेलाचा भाव जवळपास १०० डाॅलरपर्यँत खाली येईल, असा अंदाज वर्तवण्यात येत आहे. त्यामुळे पेट्रोलियम कंपन्यांनी इंधन दरवाढीबाबत दरवाढीबाबत सावध भूमिका घेतली आहे.

पेट्रोल आणि डिझेलचे दर –

आज सोमवार दिनांक ३ मार्च रोजी मुंबईमध्ये पेट्रोलचा भाव १०९.९८ रुपये/लीटर इतका आहे. तर, दिल्लीत पेट्रोल ९५.४१ रुपये/लिटर झाले आहे. कोलकात्यात एक लीटर पेट्रोल १०४.६७ रुपयांवर स्थिर असून चेन्नईत पेट्रोलचा भाव १०१.५१ रुपये इतका आहे. भोपाळमध्ये पेट्रोलचा भाव १०७.२३ रुपये आहे. सध्या देशात सर्वात कमी दरात पेट्रोल आणि डिझेल दिल्ली जवळील नोएडा शहरात मिळत असून नोएडामध्ये ९५.५१ रुपये/लिटर असा पेट्रोलचा भाव आहे.

दरम्यान, मुंबईत आज एक लीटर डिझेलचा भाव ९४.१४ रुपये आहे. तर दिल्लीत डिझेल आजही ८६.६७ रुपयांवर कायम आहे. चेन्नईत डिझेलचा भाव प्रती लीटर ९१.५३ रुपये इतका झाला असून कोलकात्यात मात्र डिझेलचा भाव ८९.७९ रुपयांवर कायम आहे. भोपाळमध्ये डिझेलसाठी ९०.८७ रुपये दर आहे. नोएडामध्ये आज एक लीटर डिझेल दर ८७.०१ रुपये आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.