Take a fresh look at your lifestyle.

PM Awas Yojana पंतप्रधान आवास योजनेविषयी मोठी बातमी! मिळणार तब्बल ‘इतकी’ रक्कम?

ओटीटी न्यूज नेटवर्क

मुंबई : PM Awas Yojana गेल्या काही दिवसांपूर्वी प्रधानमंत्री आवास योजनेविषयी महत्वाची बातमी समोर आली होती. ज्यात प्रधानमंत्री आवास योजनेद्वारे पहिले घर घेणाऱ्या नागरिकांना दोन लाखांपर्यंत सबसिडी दिली जात होती. मात्र, मार्चनंतर ही सबसिडी बंद करण्यात आली होती. मात्र, आज याच पंतप्रधान आवास योजने संदर्भात अतिशय महत्वाची बातमी समोर आली आहे. कारण, केंद्र सरकार प्रधानमंत्री आवास योजनेअंतर मिळणाऱी रक्कम वाढवण्याच्या विचारात आहे.

रेशनच्या नियमांमध्ये झालेले मोठे बदल जाणून घ्या; जूनपासून लागू होणार बदल

आता या विशेष योजनेंतर्गत घर बांधण्यासाठी चार लाख रुपये अर्थात आधीच्या तिप्पट रक्कम देण्याचा प्रस्ताव आहे. आता घरे बांधण्याचा खर्च वाढल्याचे समितीने म्हटले आहे. अशा परिस्थितीत आता रक्कमही वाढवायला हवी. जर हा प्रस्ताव मान्य झाला तर लोकांना पीएम आवास योजनेंतर्गत पूर्वीपेक्षा 3 पट जास्त पैसे मिळतील.

मोठी बातमी! उद्यापासून बदलत आहेत इनकम टॅक्‍सचे नियम, व्यवहार करण्यापूर्वी ‘या’बाबी जाणून घ्या

पंतप्रधान आवास योजनेची रक्कम वाढणार!
यापूर्वी झारखंड विधानसभेच्या अंदाज समितीने राज्यात प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत घर बांधण्यासाठी चार लाख रुपये देण्याची शिफारस केली होती. समितीचे अध्यक्ष दीपक बिरुआ यांनी पावसाळी अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी अंदाज समितीचा अहवाल सभागृहाच्या पटलावर ठेवला.

झामुमोचे आमदार दीपक बिरुआ म्हणतात की, प्रत्येक वस्तूची किंमत वाढली आहे. प्रत्यक्षात वाळू, सिमेंट, रॉड, विटा, गिट्टी यांच्या भाववाढीमुळे ग्रामीण भागात प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत बांधण्यात येणाऱ्या घरांच्या किमती वाढल्या आहेत.

केवळ ‘इतक्या’ किंमतीत नवीन Electric Scooter लाँच, जाणून घ्या रेंज आणि फीचर्स

केंद्र सरकार आणि राज्य सरकारला विनंती
बीपीएल कुटुंबे 50 हजार ते एक लाख रुपये देऊ शकत नाहीत, असे बिरुआ यांनी म्हटले आहे. अशा परिस्थितीत केंद्र आणि राज्य सरकारच्या मदतीने सुरू असलेल्या पीएम आवास योजनेंतर्गत बांधल्या जाणाऱ्या घरांची किंमत 1.20 लाखांवरून 4 लाख रुपये करण्यात यावी, जेणेकरून घरे प्रत्यक्ष बांधता येतील.

असेच सुपरफास्ट अपडेट मिळवण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

Comments are closed.