Take a fresh look at your lifestyle.

खुशखबर! आता महिलांना मिळणार मोफत शिलाई मशीन, ‘असा’ करा अर्ज

0
maher

ओटीटी न्यूज नेटवर्क

नवी दिल्ली – देशातील एक मोठी लोकसंख्या गरीब आणि कामगार महिलांची आहे. या महिलांना आयुष्य जगण्यासाठी अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते. महिलांची ही समस्या लक्षात घेऊन केंद्र सरकारने गरीब आणि कष्टकरी महिलांना मोफत शिलाई मशीन देण्याची योजना सुरू केली आहे. योजनेचा लाभ शहरी तसेच ग्रामीण भागातील महिलांना घेता येऊ शकतो.

असेच सुपरफास्ट अपडेट मिळवण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

भारतीय महिलांना स्वतंत्र म्हणजेच आत्मनिर्भर बनवण्यासाठी ही योजना सुरू करण्यात आली आहे. पीएम फ्री शिलाई मशीन योजनेअंतर्गत 20 ते 40 वर्ष वयोगटातील प्रत्येक महिला या योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्ज करू शकतात. ही योजना ग्रामीण तसेच शहरी महिलांसाठी पुर्णपणे वैध आहे.

केंद्र सरकारने सुरू केलेल्या या योजनेचं देशातील अनेक नागरिक कौतुक करत आहेत. मोफत शिलाई मशिन योजनेचा उद्देश गरीब आणि कष्टकरी महिलांना स्वावलंबी बनवून त्यांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणे हा आहे. यामुळे महिलांना स्वत:चा रोजगार सुरू करता येणार आहे. याचा वापर करून महिला दर महिन्याला चांगली कमाई करतील.

हेही वाचा – पांढऱ्या सोन्याला ऐतिहासिक ‘झळाळी’, कापसाचे दर तब्बल ‘इतक्या’ हजारांच्या पार

आवश्यक कागदपत्रे कोणती?

जर तुम्हालाही पीएम फ्री शिलाई मशीन या योजनेसाठी अर्ज करायचा असेल तर त्यासाठी आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करावी लागेल. अर्जासोबत आधार कार्ड, जन्मदाखला, आयकर प्रमाणपत्र, ओळखपत्र, दिव्यांग असेल तर त्याचे प्रमाणपत्र, शिलाई मशीन चालवण्याचे प्रमाणपत्र, मोबाईल नंबर, पासपोर्ट फोटो असणे गरजेचे आहे. ही योजना महाराष्ट्र, गुजरात, हरियाणा, कर्नाटक, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश राजस्थान, छत्तीसगढ, बिहार या राज्यांसाठी लागू आहे.

हेही वाचा – रशियन सैनिकांचा विद्रोह, आपल्याच कर्नलला टॅंकखाली चिरडून मारलं!

असा करता येईल अर्ज?

या योजनेचा लाभ घेण्यासाठी लाभार्थ्यांना केंद्र सरकारच्या www.india.gov.in. या वेबसाईटला भेट द्यावी लागेल. आता मुखपृष्ठावर वरील “शिलाई मशीन मोफत पुरवण्यासाठी अर्ज प्रपत्र” असा पर्याय तुम्हाला दिसेल, यावर क्लिक करा. यानंतर एक पीडीएफ फॉर्म ओपन होईल तो तुम्हाला डाऊलोड करायचा आहे.

आता सर्व आवश्यक तपशील त्यामध्ये भरून टाका (नाव, वडील/पतीचे नाव, जन्मतारीख आणि इतर माहिती यासारख्या सर्व तपशीलांचा उल्लेख त्यामध्ये करा).

हेही वाचा – आमदारांना घरं बांधून देणाऱ्या ठाकरे सरकारने एसटी कर्मचाऱ्यांना काय दिलं?

दरम्यान, सर्व माहिती भरल्यानंतर, तुम्हाला तुमच्या अर्जासोबत फोटोकॉपी जोडायची आहे. तसेच सर्व कागदपत्रे संबंधित कार्यालयात जमा करायची आहे. यानंतर, तुमचा अर्ज ऑफिसरद्वारे तपासला जाईल, तपासणी केल्यानंतर तुम्हाला मोफत शिलाई मशीन दिले जाणार आहे.विशेष म्हणजे या योजनेचा लाभ घेण्यासाठी लाभार्थ्याच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 1.2 लाखांपर्यंत असणे आवश्यक आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.