पी एम किसान चे पैसे आता मिळणार पोस्टात : PM Kisan 13Th instalment in post office

0

पी एम किसान सन्मान निधी योजनेचा तेरावा हप्ता वितरीत केला जाणार आहे. पी एम किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना दरवर्षी सहा हजार रुपये दिले जातात.

तेराव्या हफ्त्यापुर्वी शेतकऱ्यांनी ekyc करणे बंधनकारक करण्यात आले आहे.

आता शेतकऱ्यांना मिळणारे पैसे हे आधार संलग्न बँक खात्यात पाठविले जातात. तुमच्या आधार कार्डला जे बँक खाते लिंक असेल त्या बँक खात्यात pm किसान सम्मान निधी योजनेचे पैसे पाठविले जातात. 

जर बँक खात्याला आधार कार्ड लिंक नसेल तर  तर pm किसान सम्मान निधी योजनेचे पैसे क्रेडीट होणार नाही.

PM किसान पात्र लाभार्थी यादी पहा

ज्या शेतकऱ्यांचे बँक खात्याला आधार कार्ड लिंक नाही अशा शेतकऱ्यांनी पोस्ट ऑफिस मध्ये नवीन बँक खाते उघडून घेण्याचे आवाहन कृषी विभागाकडून करण्यात आले आहे.

 पोस्टमध्ये शंभर रुपयात बँक खाते उघडले जाते व पोस्टात उघडलेले खाते आधार कार्ड द्वारे लिंक केले जाते त्यामुळे पीएम किसान सन्मान निधी योजनेचे पैसे पोस्ट ऑफिस मधील खात्यामध्ये क्रेडिट केले जातील जर तुम्हाला यापूर्वी पी एम किसान सन्मान निधी योजनेचे पैसे केवायसी करून देखील मिळाले नसतील तर तुम्ही पोस्ट ऑफिसमध्ये नवीन खाते उघडून घ्या. .

Leave A Reply

Your email address will not be published.