PM-kisan e-kyc List : नविन वर्षात के वाय सी पूर्ण केलेल्या शेतकऱ्यांना 13 वा हफ्ता
ekyc list for pm kisan : केंद्र शासनाकडून राबवली जाणारी पीएम किसान सम्मान निधि योजना शेतकऱ्यांसाठी वरदान आहे. शेतकऱ्यांना शेती उपयोगी खते औषधे इ. घेण्यासाठी शासनाकडून दिल्या जाणाऱ्या दोन हजार रुपयांचा फायदा होत आहे.
बऱ्याच शेतकऱ्यांनी गावातील सीएससी सेंटर वर आपली केवायसी केली आहे. परंतु ही ई-केवायसी सक्सेसफुली सबमिट (ekyc successfully submited ) झाली का हे चेक करायला हवं. कारण जर आपली ई-केवायसी यशस्वीरित्या पूर्ण झाली नसेल तर आपणास येणारा पी एम किसान सन्मान निधी योजना चा तेरावा हप्ता मिळणार नाही. काही शेतकऱ्यांनी घरबसल्या मोबाईल वर आधार otp च्या सहाय्याने Ekyc पूर्ण केली आहे.
परंतु आपली ekyc पूर्ण झाल्याची खात्री करा.
पात्र शेतकऱ्यांची यादी येथे पहा
केवायसी पूर्ण झाली का ते चेक करण्यासाठी पीएम किसान सम्मान निधि योजना च्या ऑफिशिअल वेबसाईट वरती तुम्ही आपल्या नोंदणीची स्थिती चेक करू शकता. तसेच पीएम किसान सम्मान निधि योजना च्या वेबसाईटवर ती पात्र लाभार्थ्यांच्या याद्या प्रकाशित करण्यात आल्या आहेत. या यादीमध्ये देखील आपले नाव चेक करू शकता. जर आपले पीएम किसान सम्मान निधि योजना यादी मध्ये नाव दाखवत असेल तरच आपला पीएम किसान सम्मान निधि योजना तेरावा हप्ता आपल्या खात्यात जमा होईल.
नवीन वर्ष 2023 मध्ये शेतकऱ्यांच्या खात्यात दोन हजार रुपये तेरावा हप्ता दिला जाईल. प्रधानमंत्री किसान सन्माननिधी योजनेसाठी पात्र होण्यासाठी आता सर्व शेतकऱ्यांना ती केवायसी करणं बंधनकारक करण्यात आला आहे.
या शेतकऱ्यांनी अद्याप देखील आपली केवायसी केली नाही त्या शेतकऱ्यांच्या खात्यात पीएम किसान सम्मान निधि योजना चे इथून पुढे हप्ते जमा होणार नाही. शासनाने वेळोवेळी केवायसी करण्यासाठी मुदत ठरवून दिली होती.
अद्यापही काही शेतकऱ्यांनी आपली ई-केवायसी केलेली नाही. त्यामुळे जोपर्यंत शेतकरी केवायसी करत नाही तोपर्यंत त्यांना पीएम किसान सम्मान निधि योजना हप्ते वितरित केले जाणार नाही.