Take a fresh look at your lifestyle.

शेतकऱ्यांसाठी खूशखबर! PM Kisan योजनेच्या लाभार्थ्यांसाठी केंद्र सरकारची मोठी घोषणा

ओटीटी न्यूज नेटवर्क

मुंबई – PM Kisan पीएम किसान योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना 11व्या हप्त्याची रक्कम मिळणार आहे. कृषी मंत्री नरेंद्र सिंह तोमर यांनी एका कार्यक्रमादरम्यान सांगितले की किसान सन्मान निधीचा 11 वा हप्ता पंतप्रधान 31 मे रोजी देणार आहेत. परंतु 11व्या हप्त्यासाठी शेतकऱ्यांना ई-केवायसी पूर्ण करावे लागेल.

IPL २०२२ मोठी बातमी… आयपीएलच्या फायनल सामन्यात मोठा बदल! मोठं कारण समोर

केंद्र सरकारची घोषणा
केंद्र सरकारने आता या योजनेचा लाभ मिळवण्यासाठी अनिवार्य eKYC ची अंतिम मुदत वाढवली आहे. यापूर्वी त्याची अंतिम तारीख 22 मे 2022 होती. पीएम किसान पोर्टलवर (pmkisan.gov.in) ही माहिती देण्यात आली आहे. माहितीनुसार, आता eKYC 31 मे 2022 पर्यंत पूर्ण करता येईल.

ई-केवायसी पूर्ण केली नसल्यास तुमचा हप्ता थांबू शकतो शकतो. लवकरच PM किसान सन्मान निधी योजनेचा 11 वा हप्ता देखील जारी केला जाईल.

सोनं खरेदीदारांना दिलासा! सोन्याचे दर घसरुन 50 हजारांखाली; जाणून घ्या नवे दर

पीएम किसान पोर्टलवर असे सांगण्यात आले आहे की, आधार आधारित ओटीपी प्रमाणीकरणासाठी शेतकऱ्यांना किसान कॉर्नरमधील ई-केवायसी पर्यायावर क्लिक करावे लागेल.

बायोमेट्रिक प्रमाणीकरणासाठी जवळच्या CSC केंद्राला भेट द्यावी लागेल. हे काम तुम्ही तुमच्या मोबाईल, कॉम्प्युटर किंवा लॅपटॉपवरून घरी बसूनही करू शकता.

वाह ! शेतकऱ्यांसाठी ठाकरे सरकारची ‘ट्रॅक्टर आमचा डिझेल तुमचे’ योजना; जाणून घ्या भन्नाट फायदे

त्याची प्रक्रिया जाणून घ्या

  1. आधार आधारित OTP प्रमाणीकरणासाठी फार्मर्स कॉर्नरमधील ‘eKYC’ पर्यायावर क्लिक करा
  2. बायोमेट्रिक प्रमाणीकरणासाठी जवळच्या CSC केंद्रांशी संपर्क साधा.
  3. तुम्ही तुमच्या मोबाईल, लॅपटॉप किंवा कॉम्प्युटरच्या मदतीने ते घरी बसून पूर्ण करू शकता.
  4. यासाठी, सर्वप्रथम तुम्ही https://pmkisan.gov.in/ पोर्टलवर जा.
  5. उजव्या बाजूला तुम्हाला असे टॅब दिसतील. सर्वात वर तुम्हाला e-KYC लिहिलेले दिसेल. त्यावर क्लिक करा.

असेच सुपरफास्ट अपडेट मिळवण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

Comments are closed.