Take a fresh look at your lifestyle.

PM KISAN : PM Modi मोदी सरकारने तब्बल 10 कोटी शेतकऱ्यांच्या खात्यात दिली 21 हजार कोटींची भेट

ओटीटी न्यूज नेटवर्क

नवी दिल्ली – PM KISAN : PM Modi पीएम किसान सन्मान निधीच्या (PM Kisan Sanman( Nidhi) 11व्या हप्त्याची वाट पाहणाऱ्या शेतकऱ्यांची प्रतीक्षा संपली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज 31 मे 2022 रोजी 10 कोटी पेक्षा जास्त लाभार्थी शेतकरी farmer) कुटुंबांना 21,000 कोटी रुपयांहून अधिकची सन्मान निधी रक्कम त्यांच्या बँक खात्यांमध्ये DBT द्वारे हस्तांतरित केली आहे.

आनंदाची बातमी! एलपीजी LPG सिलेंडरच्या दरात तब्बल इतक्या रुपयांची घसरण जाणून घ्या आजचे नवे दर

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत शिमला येथे ‘गरीब कल्याण संमेलन’ आयोजित कार्यक्रमादरम्यान पीएम किसान सन्मान निधीची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात हस्तांतरित करण्यात आली. निधी हस्तांतरित करण्याबरोबरच, पंतप्रधान मोदींनी लाभार्थी शेतकऱ्यांशी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद देखील साधला.

Credit Card फक्त मिळतंय म्हणून घेऊ नका; वर लागणारे चार्जेस तपासून घ्या

असे चेक करा खात्यात पैसे

आतापर्यंत शेतकरी रजिस्ट्रेशननंतर आपले स्टेट्स स्वत: चेक करु शकत होते. अर्जाची स्थिती काय आहे, पैसे आले की नाही हे शेतकऱ्यांना पाहता येत होते. आतापर्यंत शेतकरी पीएम किसान पोर्टलवर जाऊन आपला आधार नंबर, मोबाइल अथवा अकाउंट नंबर टाकून पैसे जमा झालेत की नाही याची खात्री करत होते. पण, आता हा नियम लागू होणार नाही.

CET परीक्षेसंदर्भात राज्य सरकारचा मोठा निर्णय; परीक्षेच्या तारखा देखील जाहीर

आता शेतकऱ्यांना मोबाईल क्रमाकांच्या माध्यमातून आपले स्टेट्स पाहता येणार नाही. आता केवळ आधार आणि बँक खात्याच्या माध्यमातून स्टेट्स जाणून घेऊ शकतात. यापुढे, जर एखाद्या शेतकऱ्याला लाभार्थी किंवा इतर स्टेटस तपासायचे असेल तर त्याला किसान पोर्टलवर आधार क्रमांक किंवा बँक खाते क्रमांक द्यावा लागेल.

मोदी सरकारच्या या नव्या नियमामुळे Maruti Suzuki अडचणीत, Alto, WagonR, Celerio चं भविष्य अंधारात

मोबाईल नंबरच्या माध्यमातून शेतकऱ्यांना स्टेटस चेक करणे सोपे जात होते. पण अनेक लोक कोणत्याही मोबाईल नंबरवरुन स्टेटस चेक करत होते. अनेकवेळा लाभार्थी सोडून अन्य लोक याची माहिती घेत होते. ही सुविधा आता बंद करण्यात आली आहे.

असेच सुपरफास्ट अपडेट मिळवण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

Comments are closed.