Take a fresh look at your lifestyle.

शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी, PM किसानच्या 11 व्या हप्त्याची तारीख ठरली!

0
maher

ओटीटी न्यूज नेटवर्क

नवी दिल्ली: देशभरातील शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. PM किसान सन्मान निधी योजनेच्या 11 व्या हप्त्याची तारीख जवळपास निश्चित झाली आहेत. 11 वा हप्ता एप्रिल महिन्याच्या पहिल्याच आठवड्यात थेट शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होण्याची शक्यता आहे. दरवर्षी योजनेचा पहिला हप्ता 1 एप्रिलनंतरच सरकारकडून दिला जातो.

असेच सुपरफास्ट अपडेट मिळवण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

पीएम किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत पात्र शेतकरी कुटुंबांना दरवर्षी 6,000 रुपयांची आर्थिक मदत दिली जाते. ही रक्कम प्रत्येकी 2000 रुपयांची असते. वर्षातून तीन वेळा शेतकऱ्यांच्या खात्यावर 2000 रुपयांची रक्कम वर्ग केली जाते. हे हप्ते दर चार महिन्यांनी येतात. म्हणजे वर्षातून तीनदा, दोन हजार रुपये या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांच्या खात्यावर पाठवले जातात.

हेही वाचा – राज्य अंधारात जाण्याची भीती, ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी घेतला मोठा निर्णय!

आतापर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यावर या योजनेअंतर्गत 10 हप्ते जमा करण्यात आले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जानेवारी 2022 मध्ये व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे या योजनेतील 10 वा हप्ता जारी केला होता. त्यानंतर आता 11 वा हप्ता एप्रिलमध्ये म्हणजेच पुढील महिन्याच्या पहिल्या आठवड्यात शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होण्याची शक्यता आहे.

हेही वाचा – थरारक घटना! पतीला वाचवण्यासाठी ‘तिने’ थेट बिबट्याला मारले ठोसे, अन् अखेर…

दरम्यान, जे शेतकरी या योजनेचा लाभ घेण्यास पात्र आहेत त्यांनी पीएम किसान खात्याशी आधार लिंक करणे आवश्यक आहे. तुम्ही तुमचा आधार क्रमांक अजून लिंक केला नसेल, तर तुम्ही ताबतोब करणं गरजेचं आहे. लक्षात ठेवा eKYC करण्याची मुदत सुरूवातीला 31 मार्च पर्यंतची होती. आता ती वाढवण्यात आली आहे.

हेही वाचा – भाजपला हरवण्याचा फॉर्म्युला काय?; नितीन गडकरींनी दिलं ‘हे’ उत्तर…

असे करा eKYC कसे अपडेट 

सर्वप्रथम पीएम किसान वेबसाइटवर जा.

पेजच्या उजव्या बाजूला असलेल्या eKYC पर्यायावर क्लिक करा.

तुमचा आधार कार्ड नंबर एंटर करा, कोड टाका आणि सर्च वर क्लिक करा

आधार कार्डशी लिंक केलेला मोबाईल नंबर टाका

OTP आल्यानंतर तो परत टाका

यासह, तुमचा आधार लिंक केला जाईल आणि तपशील अपडेट केला जाईल. OTP टाकताना कोणतीही त्रुटी आढळल्यास, तुम्ही CSC केंद्रांना भेट देऊन तुमचे बायोमेट्रिक अपडेट करू शकता.

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.