Take a fresh look at your lifestyle.

पीएम किसान योजना; ‘या’ दिवशी जमा होणार ११ वा हप्ता

0
maher

ओटीटी न्यूज नेटवर्क

नवी दिल्ली : पीएम किसान योजनेचे 12 कोटींहून अधिक लाभार्थी 11व्या हप्त्याच्या प्रतीक्षेत आहेत. प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या लाभार्थ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. एप्रिल ते जुलैचा हप्ता या महिन्यात येऊ शकतो. गेल्या वर्षी हा हप्ता 15 मे रोजी आला होता. मात्र यावेळी रामनवमी किंवा आंबेडकर जयंतीच्या दिवशी येण्याची दाट शक्यता आहे.

शेतकऱ्यांना आर्थिक मदत

केंद्र सरकारच्या पीएम किसान सन्मान निधी अंतर्गत शेतकऱ्यांच्या खात्यात दरवर्षी 6 हजार रुपये ट्रान्सफर केले जातात. त्याच्या खात्यात वर्षभरात 2-2 हजार रुपयांचे तीन हप्ते ट्रान्सफर होतात. 2018 मध्ये पंतप्रधान किसान योजना सुरू करण्यात आली. शेतकऱ्यांना आर्थिक मदत करणे हा त्याचा उद्देश आहे.

आतापर्यंत 10 हफ्ते जमा

1 जानेवारीला 10 व्या हप्त्याचे 2 हजार रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात ट्रान्सफर करण्यात आले आहेत. आता शेतकऱ्यांना 11वा हप्ता मिळणार आहे. पण, केवायसी अपडेट झाल्यावरच ते उपलब्ध होईल. पीएम किसान योजनेअंतर्गत आतापर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यात 10 हप्ते हस्तांतरित करण्यात आले आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.