Take a fresh look at your lifestyle.

PM Kisan Yojna शेतकऱ्यांनो लक्ष द्या! पंतप्रधान नरेंद्र मोदी या दिवशी किसान सन्मान निधीचा 11 वा हप्ता जारी करणार

ओटीटी न्यूज नेटवर्क

मुंबई – PM Kisan Yojna पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) 31 मे रोजी शेतकऱ्यांसाठी प्रधानमंत्री किसान सन्मान (PM Kisan Yojna) निधी योजनेअंतर्गत 21,000 कोटी रुपयांचा 11 वा हप्ता जारी करतील, ज्याचा फायदा 10 कोटींहून अधिक शेतकऱ्यांना होणार आहे.

मान्सूनने दिली आनंदाची बातमी; या तारखेला महाराष्ट्रात आगमन होणार!

रविवारी जारी केलेल्या निवेदनात कृषी मंत्रालयाने म्हटले आहे की, पंतप्रधान मोदी या योजनेचा 11वा हप्ता शिमला, हिमाचल प्रदेश येथे जारी करतील. गरीब कल्याण संमेलनाचा एक भाग म्हणून केंद्र सरकारच्या 16 योजना आणि कार्यक्रमांचा लाभ घेणाऱ्या लोकांशी पंतप्रधान मोदी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे संवाद साधतील. ‘आझादी का अमृत महोत्सव’ अंतर्गत गरीब कल्याण संमेलन या राष्ट्रीय कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. PM Kisan Yojna

रोहित, धोनीला जमलं नाही ते हार्दिकनं केलं, फायनलमध्ये केला जबरदस्त रेकॉर्ड

निवेदनात म्हटले आहे की किसान सन्मान निधी योजने अंतर्गत पंतप्रधान 21,000 कोटी रुपयांचा 11 वा हप्ता जारी करतील. दुसरीकडे केंद्रीय कृषिमंत्री नरेंद्र सिंह तोमर दिल्लीतील पुसा कॅम्पसमधून या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत.

प्रधानमंत्री किसान सन्मान निधी PM Kisan Yojna योजनेंतर्गत, केंद्र सरकार दरवर्षी 6 हजार रुपये देशातील शेतकऱ्यांच्या खात्यात हस्तांतरित करते. प्रत्येकी 2,000 रुपयांच्या तीन समान हप्त्यांमध्ये ते वितरित केले जाते. ही रक्कम थेट लाभार्थ्यांच्या बँक खात्यात जमा केली जाते. 1 जानेवारी रोजी, पंतप्रधानांनी 20,000 कोटींहून अधिक रुपयांचा 10 वा हप्ता जारी केला होता, ज्याचा 10 कोटीहून अधिक शेतकरी कुटुंबांना फायदा झाला.

आताची सर्वात मोठी बातमी! ‘या’ कारणाने आज महाराष्ट्रात पेट्रोल खरेदी बंद

पीएम मोदी विविध योजनांच्या लाभार्थ्यांशी संवाद साधणार

कृषी मंत्रालयाने सांगितले की, हा देशातील आतापर्यंतचा सर्वात मोठा एकल कार्यक्रम आहे, ज्या अंतर्गत देशातील सर्व जिल्ह्यांमध्ये देशव्यापी सल्लामसलत केली जाईल आणि पंतप्रधान मोदी विविध योजनांच्या लाभार्थ्यांशी संवाद साधतील. कार्यक्रमाचे दूरदर्शनच्या राष्ट्रीय आणि प्रादेशिक वाहिन्यांवर थेट प्रक्षेपण केले जाईल. याशिवाय MyGov.in द्वारेही वेबकास्ट केले जाईल. हा कार्यक्रम इतर सोशल मीडियावरही पाहता येईल.

मान्सूनने दिली आनंदाची बातमी; या तारखेला महाराष्ट्रात आगमन होणार!

किसान योजनेचं स्टेटस तपासा

सर्वप्रथम पीएम किसानच्या अधिकृत वेबसाइट https://pmkisan.gov.in/ वर जा.

येथे तुम्हाला उजव्या बाजूला Farmers Corner चा पर्याय मिळेल.

येथे Beneficiary Status या पर्यायावर क्लिक करा. नवीन पेज उघडेल.

नवीन पेजवर आधार क्रमांक, बँक खाते क्रमांक किंवा मोबाइल क्रमांक यापैकी कोणताही एक पर्याय निवडा. या तीन क्रमांकांद्वारे तुम्ही तुमच्या खात्यात पैसे आले आहेत की नाही हे तपासू शकता.

तुम्ही निवडलेल्या पर्यायाचा क्रमांक टाका. त्यानंतर Get Data वर क्लिक करा.

येथे क्लिक केल्यानंतर तुम्हाला व्यवहाराची सर्व माहिती मिळेल.

असेच सुपरफास्ट अपडेट मिळवण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

Comments are closed.