Take a fresh look at your lifestyle.

दंदे हॉस्पिटलच्या परिचारिकेला पंतप्रधानांचे पत्र; राज्य माहिती आयुक्त राहुल पांडे यांच्या हस्ते प्रदान

0

ओटीटी न्यूज नेटवर्क

नागपूर : लसीकरणाच्या मोहिमेत उत्तम कामगिरी बजावल्याबद्दल दंदे हॉस्पिटल्सच्या वरीष्ठ परिचारिका आशा सरदार यांचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पत्र पाठवून कौतुक केले आहे. हॉस्पिटलला अलीकडेच हे पत्र प्राप्त झाले असून राज्याचे माहिती आयुक्त राहुल पांडे यांच्या हस्ते आशा सरदार यांना ते प्रदान करण्यात आले.

हॉस्पिलटल्या सभागृहात आयोजित या कार्यक्रमाला ज्येष्ठ पत्रकार बाळ कुळकर्णी अध्यक्षस्थानी होते. तर दंदे हॉस्पिटल्सचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. पिनाक दंदे, संचालक डॉ. सीमा दंदे व प्रसिद्ध छातीरोगतज्ज्ञ डॉ. सुशांत मुळे यांची प्रमुख उपस्थिती होती. ‘लसीकरणाच्या मोहिमेतील आपल्या सक्रीय सहभागामुळे भारताला नवा इतिहास रचता आला. कोरोना महामारीच्या काळात नागरिकांचे प्राण वाचविण्याच्या प्रयत्नांमध्ये आपण महत्त्वाची भूमिका बजावली. या अभियानात आपण अग्रस्थानी येऊन जबाबदारी पार पाडल्याबद्दल आपलं मनःपूर्वक अभिनंदन’, या शब्दांमध्ये पंतप्रधान मोदींनी आशा सरदार यांचे कौतुक केले आहे.

गणेश विसर्जन मिरवणुकीत शिंदे-ठाकरे समर्थक आपसात भिडले; तणावपूर्ण वातावरण पोलिसांच्या मध्यस्तीने निवळले

राहुल पांडे यांनी कोरोना काळातील सेवाकार्याबद्दल दंदे हॉस्पिटलचे कौतुक केले. ते म्हणाले, ‘पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून आलेल्या पत्राचं श्रेय डॉ. पिनाक दंदे स्वतःकडे घेऊ शकले असते. पण त्यांनी प्रत्यक्ष काम करणाऱ्या परिचारिकेला संपूर्ण श्रेय दिले. समाजात श्रेय घेण्याची चढाओढ सुरू असताना श्रेय देण्याचे काम त्यांनी केले, हे कौतुकास्पद आहे.’

बाळासाहेब कुळकर्णी म्हणाले की, ‘पंतप्रधानांनी पाठवलेले पत्र ही आशा सरदार यांच्यासाठी कौतुकाची पावती आहे, असे मी म्हणणार नाही. कारण पावती दिली म्हणजे व्यवहार संपतो आणि परिचारिकेने आयुष्यभर सेवेचे व्रत घेतले असते. त्यामुळे आशा सरदार यांच्या कार्याला पंतप्रधानांनी पाठिंबा दिला आहे, असं मी म्हणेन.’ समाजासाठी काहीतरी देणं लागतो या विचारातून वैद्यकीय सेवा करणारे डॉक्टर म्हणून पिनाक दंदे यांचा नावलौकीक असल्याचेही ते म्हणाले.

ऑन धिस टाईम मीडियातर्फे ‘विदर्भ आयडॉल’ पुरस्कार वितरण रविवारी; ‘हा’ अभिनेता देणार ५० कर्तृत्ववान व्यक्तींना शाबासकीची थाप

डॉ. पिनाक दंदे म्हणाले, ‘पंतप्रधानांचे पत्र हे आमच्या सर्व कर्मचाऱ्यांचे कौतुक आहे. कोरोनाच्या दोन्ही लाटांमध्ये आणि लसीकरणाच्या मोहिमेत आशा सरदार यांच्यासह सर्व सहकाऱ्यांनी समर्पणाच्या भावनेतून कार्य केले. त्याची दखल भारत सरकारने घेतली, याचा आनंद आहे.’ डॉ. सीमा दंदे यांनी या पत्राचे वाचन केले. यावेळी गणेशोत्सवाच्या निमित्ताने आयोजित विविध स्पर्धांमधील विजेत्यांचाही गौरव करण्यात आला.

असेच सुपरफास्ट अपडेट मिळवण्याकरिता या लिंकवर क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.