Take a fresh look at your lifestyle.

LOAN ग्राहकांना मोठा झटका; सर्व प्रकारचे लोन महागले, EMI चा बोजाही वाढला

maher

ओटीटी न्यूज नेटवर्क

मुंबई – Reserve Bank रिझर्व्ह बँकेच्या रेपो दरात (Repo Rate) वाढ त्यानंतर जवळपास सर्वच सार्वजनिक आणि खाजगी क्षेत्रातील बँकांनी त्यांच्या कर्जाचे व्याजदर (Loan Interest Rates) वाढवले ​​आहेत. SBI, HDFC सह सर्व बँकांनंतर आता सार्वजनिक क्षेत्रातील पंजाब नॅशनल बँकेने (PNB) आपला MCLR वाढवला आहे.

आत्ताची सर्वात मोठी बातमी! सोनिया गांधी आणि राहुल गांधी ईडीच्या भोवऱ्यात; देशाच्या राजकारणात खळबळ

PNB ने म्हटले की, 1 जून MCLR 0.15 टक्क्यांनी वाढवला आहे. नवे दर आजपासून लागू झाले असून त्याचा परिणाम गृहकर्ज, वाहन आणि वैयक्तिक कर्जासह (Home loan, Personal Loan, Car Loan) सर्व प्रकारच्या कर्जांवर दिसून येईल. यापूर्वी रिझर्व्ह बँकेने रेपो दरात 0.40 टक्क्यांनी वाढ केली होती, त्यानंतर रेपो दर 4.40 टक्क्यांवर पोहोचला आहे. यानंतर सर्व बँकांनी त्यांच्या कर्जाचे व्याजदर वाढवले ​​होते.

सर्वात स्वस्त ७ सीटर कार! नवीन लूक पाहून थक्क व्हाल; पेट्रोलसह CNG चाही पर्याय उपलब्ध

कर्जावर किती व्याज आहे?

LOAN PNB ने सांगितले की नवीन दर लागू झाल्यानंतर, एक वर्षाच्या कर्जावरील MCLR आता 7.40 टक्के झाला आहे, जो आतापर्यंत 7.25 टक्के होता. या बँकेची बहुतांश कर्जे केवळ MCLR वर आधारित आहेत, त्यामुळे त्या कर्जांचे हप्तेही आता वाढणार आहेत.

बँकेने एक दिवस, एक महिना आणि तीन महिन्यांसाठी MCLR 0.15 टक्क्यांनी वाढवला आहे. यानंतर एका दिवसाच्या कर्जावरील नवीन दर 6.60 वरून 6.75 टक्के झाला आहे. एक महिन्याचा MCLR आता 6.80 टक्के आहे, जो पूर्वी 6.65 टक्के होता.

असेच सुपरफास्ट अपडेट मिळवण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

याशिवाय, एक महिन्याचा MCLR देखील 0.15 टक्क्यांनी वाढला आहे आणि त्याचा नवीन दर आता 6.90 टक्के झाला आहे, जो पूर्वी 6.75 टक्के होता. बँकेने 6 महिन्यांच्या कर्जावरील व्याजदरही 7.10 टक्के केला आहे. बँकेने तीन वर्षांच्या कर्जावरील MCLR 0.15 टक्क्यांनी वाढवून 7.70 टक्के केला आहे.

Comments are closed.